लासलगाव- येथील कृषी उत्पन्न बाजार आवारातून गुरूवारी पहाटे चारच्या सुमारास दोन जनावरांना गुंगीचे औषधे देऊन स्कार्पीओत घेऊन चोरीच्या उद्देशाने कत्तलीला नेण्याचा प्रयत्न करणाºया तिघांनी पोलीस व नागरिक पाहताच गाडी सोडून पलायन केले. गुरूवारी पहाटे स्कार्पीओ गाडी नंबर (एमएच ०४ बीजे ६२५३) या गाडीचे शिट खाली करून दोन जनावरांच्या शरीराला गुंगीचे औषध टोचून ती कत्तलीला नेण्याचा प्रयत्न करणाºया इसमाबाबत संशय येताच काही जागरूक युवकांनी हा प्रकार पोलिसांना कळविला. गस्तीवर असलेले लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे , कर्मचारी कैलास महाजन व चालक दत्तात्रय आहिरे यांचे वाहन पाहताच अंधाराचा फायदा घेत संशयित पलायन करण्यात यशस्वी झाले. वरील गाडीची तपासणी केली असता गाडीची कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली. सदर स्कार्पीओ गाडी नंबर एमएच ०४ बीजे ६२५३ या असा आहे. याबाबत लासलगाव पोलिसांना वाहन बेवारस सापडले. याबाबत पोलिसांनी नोंद घेतली असुन अधिक तपास लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कत्तलीसाठीची जनावरे चोरणाºयांचे स्कार्पिओ सोडून पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 2:55 PM