शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ८ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
3
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
4
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
5
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
6
शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा
7
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
8
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
9
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
10
माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली
11
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
12
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
13
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
14
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
15
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
16
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
17
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
18
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
19
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
20
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर

हलकल्लोळ...अश्रुंचे लोट...अन् संतापाचा आगडोंब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:14 AM

नाशिक : ओ डॉक्टर, ओ डॉक्टर... ओ सिस्टर, ओ सिस्टर... ओ दादा... ओ कुणीतरी बघा हो आमच्या पेशंटला दादा... ...

नाशिक : ओ डॉक्टर, ओ डॉक्टर... ओ सिस्टर, ओ सिस्टर... ओ दादा... ओ कुणीतरी बघा हो आमच्या पेशंटला दादा... ओ सिस्टर आमच्या पेशंटला वाचवा हो... कुणी पेशंटच्या छातीवर पंपिंग करतंय, कुणी हातपाय चोळतंय, कुणी ऑक्सिजन सिलेंडर कुठे मिळतंय का म्हणून धावतंय तर कुणाच्या रुग्णाने श्वासच थांबवल्याने उर बडवून घेतोय. इतके विदारक आणि जीवाचा थरकाप उडवणारे दृश्य दुपारी साडेबारा ते दीडदरम्यान झाकीर हुसेन रुग्णालयात होते. सर्वत्र हलकल्लोळ, रडारड, आणि संतापाचा आगडोंब उफाळून येत होता.

झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानकपणे ऑक्सिजन टँकची गळती होण्यास प्रारंभ होताच जे रुग्ण व्हेंटिलेटरवर होते, त्यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होणे कमी झाले, तर जे ऑक्सिजनवर होते त्यांचा ऑक्सिजन पुरवठादेखील कमी झाल्याने सर्वत्र अंदाधुंद परिस्थिती निर्माण झाली होती. तब्बल १५ रुग्ण जे व्हेंटिलेटरवर होते, त्या रुग्णांची अवस्था बिकट होती. तसेच ऑक्सिजनवर असलेल्या १३१ पैकी सुमारे निम्मे रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याने त्यांनादेखील नितांत आवश्यकता होती. अशा वेळी अचानकपणे उद्भ‌वलेल्या या पेचप्रसंगामुळे रुग्णालयातील सर्व रुग्णांकडून अचानकपणे पुकारा होऊ लागला. डॉक्टर्स, वॉर्डबॉय आणि नर्सेसची प्रचंड धावपळ उडाली. ऑक्सिजन पुरेशा प्रेशरने मिळावे, यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागले. अत्यावस्थ रुग्णाजवळ थांबून पंपिंग करण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच उरले नव्हते. अशावेळी ज्या रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटलच्या परिसरातच थांबले होते, त्यांनी तातडीने आतमध्ये धाव घेत आपापल्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु केली. कुणी डॉक्टरांच्या नावाने हाक मारतोय, कुणी एखाद्या वॉर्डबॉयचा हात धरुन त्याला आपल्या पेशंटजवळ येण्याची विनंती करतो, कुणी सिस्टरसमोर रडतोय, ओरडतोय सर्वत्र गोंधळ माजल्याचे हृयद्रावक चित्र हॉस्पिटलमध्ये दुपारी साडेबारापासून सुमारे दोन तासांहून अधिक काळ सुरु होते.

इन्फो

काळजाचा थरकाप उडवणारा टाहो

साडेबारा वाजेपासून तब्बल दीड तास रुग्णालय आणि रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा टाहो उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडवणारा होता. कुणाचे अश्रू थांबत नव्हते, तर कुणी रडून, रडून अस्वस्थ झाल्याने बसल्या जागीच कोसळत होते. कुणाचे आप्त आक्रोश करणाऱ्या जिवलगाला जवळ घेऊन त्यांचा आक्रोश शांत करीत, समजूत घालत होते. काही संतप्त नातेवाईक तर नंतर ऑक्सिजन सिलेंडर आणणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावरदेखील धावून जात होते. एकेका मृताच्या कुटुंबीयांच्या टाहोने संपूर्ण रुग्णालय दणाणून गेले होते.