जिल्ह्यामध्ये कोरोना नियमांचे पालन व्हावे यासाठी लॉकडाऊन केले होते. मात्र रुग्ण कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात येऊन शासनाने बाजार समित्या पूर्ववत केल्या. बाजार समितीत गर्दी होत असल्याने कोरोना नियमांचे पालन होणेकामी बाजार घटकांच्या आरोग्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मास्क स्क्रीनिंगद्वारे शारीरिक तापमान जास्त असलेल्या नागरिकांना शोधणे, यासाठी स्मार्ट हेल्मेट तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे रुग्णांवर योग्य औषधोपचार होणेकामी साहाय्य करणे यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे सभापती पिंगळे यांनी सांगितले. यावेळी सेलहॉलमध्ये मास्क स्क्रीनिंग कशी केली जाणार याचे मार्गदर्शन केले. यावेळी मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे, बीजेएस मिशन झिरो प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, विभागीय अधिकारी विवेक धांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर, भूषण देशमुख तसेच बीजेएससाज दीपक चोपडा, अभय ब्रम्हेचा, यतीश डुंगरवाल, गोटू चोरडिया, सतीश बोरा, संचालक दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, रवींद्र भोये, संदीप पाटील, सहायक सचिव प्रकाश घोलप, निवृत्ती बागुल, रवींद्र तुपे, डॉ. शालोम सय्यद उपस्थित होते. इन्फो====
बाजार समिती घटकांची सुरक्षितता गरजेची नाशिक बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. बाजार समिती घटकांच्या आरोग्याच्यादृष्टीने बाजार समिती योग्य ती काळजी घेत असते. शेतकरी, बाजार घटक यांनी मास्क स्क्रीनिंग करताना संबंधित कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. त्यामुळे बाजार समितीत कोराना संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल. - देविदास पिंगळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती