दुगारवाडीत बुडालेल्या औरंगाबादच्या रघुवंशीचा शोध पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 01:46 PM2019-12-19T13:46:54+5:302019-12-19T13:57:48+5:30

काव्याने अनुषा व उप्पाला यांनाही धबधब्यापर्यंत जाऊ नका..., येथूनच आपण पुन्हा माघारी निघून जाऊ असे सांगितले होते; मात्र ते तिघे ‘आम्ही खाली जाऊन बघून येतो, तुम्ही येथे आमची वाट बघा...’ असे सांगून गेले ते कायमचेच.

The search for Raghuvanshi of Aurangabad drowned in Dugarwadi resumed | दुगारवाडीत बुडालेल्या औरंगाबादच्या रघुवंशीचा शोध पुन्हा सुरू

दुगारवाडीत बुडालेल्या औरंगाबादच्या रघुवंशीचा शोध पुन्हा सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देगुरूवारी सकाळी पुन्हा शोधकार्य हातीते तिघे 'तुम्ही येथे आमची वाट बघा...' असे सांगून गेले ते कायमचेच.

नाशिक :त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेल्या दुगारवाडी धबधबा येथे फिरण्यासाठी आलेल्या औरंगाबादच्या एका कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी अनुषा गोरांतला (२१,) उप्पाला कोट्टी रेड्डी (२०), रिम्मालापुडी रघुवंशी (२१) हे तीघे मित्र आपल्या अन्य तीन मित्र-मैत्रिणीसह सहलीसाठी आले होते. धबधब्याखाली डोहाच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मंगळवारी (दि.१७) संध्याकाळी तीघे बुडाले. यापैकी अनुशा, उप्पाला या दोघांचे मृतदेह बुधवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करणाऱ्या पथकाच्या हाती लागले; मात्र बेपत्ता झालेल्या रघुवंशीचा मृतदेह अद्याप हाती लागला नसून गुरूवारी (दि.१९) दुपारी १२ वाजेपासून पुन्हा शोधकार्य राबविले जात आहे.

याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, एकूण सहा मित्रमैत्रिणी दुचाकीद्वारे प्रवास करत औरंगाबाद येथून नाशिकला आले होते. औरंगाबादच्या कांचनवाडी येथील सीएसएमएसएस कृषी महाविद्यालयाचे हे विद्यार्थी होते. सहाही विद्यार्थी मुळ तेलंगणा राज्यातील आहे. शिक्षणासाठी ते औरंगाबादला वस्तीगृहात राहत होते. आकाश गिरिधर (२०), कैपू व्यंकटेश्वरा रेड्डी (२०, दोघे.रा.तेलंगणा), काव्या लक्ष्यशेट्टी (२०,रा. हैदराबाद) हे मित्र-मैत्रिणीदेखील यांच्यासोबत होते; मात्र हे तीघे दुगारवाडीच्या धबधब्यापर्यंत खाली उतरून गेले नाही तर वनविभागाच्या कमानीजवळच थांबले. काव्याने अनुषा व उप्पाला यांनाही धबधब्यापर्यंत जाऊ नका..., येथूनच आपण पुन्हा माघारी निघून जाऊ असे सांगितले होते; मात्र ते तिघे ‘आम्ही खाली जाऊन बघून येतो, तुम्ही येथे आमची वाट बघा...’ असे सांगून गेले ते कायमचेच.

सायंकाळ होऊन अंधार पडू लागल्याने काव्या, कैपू, काव्या, आकाश हे तीघे दुचाकीवरून पुन्हा गंगापुर-गोवर्धन येथील एका विनियार्डमध्ये मुक्कामी आले. रात्री पुन्हा यांनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क मोबाईलवर केला; मात्र संपर्क होत नसल्याने हे तीघेही घाबरले. त्यामुळे या तीघांनी रात्री पुन्हा दुगारवाडी गाठण्याचा निर्णय घेतला. जवळपासच्या नागरिकांची मदत घेत या तीघांनी त्यांच्या डोंगर उतरून धबधब्याजवळ गेलेल्या मित्र-मैत्रिणीचा शोध सुरू केला; मात्र येथे काळाकुट्ट अंधार, रातकिड्यांची किरकिर ऐकू येत असल्याने गावकऱ्यांनी त्यांना सकाळीच शोध घेऊ असे सांगून काढून दिले. कारण या भागात वन्यजीवांचाही वावर आहे.

बुधवारी हे तीघे सकाळी पुन्हा धबधब्याजवळ पोहचले. गावक-यांच्या मदतीने शोध सुरू केला असता त्यांना काही अंतरावर तुटलेली चप्पल आणि दगडावर ठेवलेले मोबाइल सापडून आले. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ गावकºयांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना माहिती दिली. दुपारी अडीच वाजता वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे चांदोरी बचाव पथकाला मृतदेह काढण्यासाठी तसेच बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले. ‘वैनतेय’ व चांदोरीचे सागर गडाख यांचे बचाव पथक सुमारे मागील सहा ते सात तासांपासून राबत अनुषा, उप्पाला या युवकाचा मृतदेह शोधून बाहेर काढला. अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, तहसिलदार दिपक गिरासे, सहायक निरिक्षक रामचंद्र कर्पे हे घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी रात्री नऊ वाजेपर्यंत शोधमोहीम सुरू होती; मात्र अंधार आणि वन्यजीवांसह सर्पांचा वावर असल्यामुळे वालावलकर यांनी शोधमोहीम थांबविण्याचे आदेश देत गुरूवारी सकाळी पुन्हा शोधकार्य हाती घेण्याच्या सूचना केल्या.

Web Title: The search for Raghuvanshi of Aurangabad drowned in Dugarwadi resumed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.