खते ,बियाणे, किटकनाशकांच्या खरेदी विक्रीवर नजर ; नाशकातील कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:03 PM2020-06-25T16:03:18+5:302020-06-25T16:09:05+5:30
नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात ४८ निरीक्षकांच्या देखरेखीत पुढील दहा दिवसांत जिल्हाभरातील सुमारे साडेसात हजार दुकानांतील खते, बि-बियाणे व किटकनाशकांचा साठा, विक्री व उपलब्धतेविषयी तपासणी करण्यात येणार आहे.
नाशिक : जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी तालुकानिहाय नियोजन तयार करण्यात आले आहे. राज्य सरकारमधील कृषीमंत्री दादा भूसे यांनी औरंगाबाद येथे एका दुकानात धकड देत खत विक्रीतील गैरप्रकार उघडकीस आणल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील कृषी विभागानेही तत्काळ दखल घेत बुधवारपासून (दि.२४) जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेअंतर्गत शेतीसाठी आवश्यक खते, बी-बीयाणे, किटकनाशक औषधांच्या विक्री व साठवणुकीविषी माहिती घेतली जाणार असून परवानाधारक तसेचे अवैधरीत्या व्यावसाय करणाऱ्या बिगर परवानाधारक दुकानांची या मोहीमेत तपासणी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागातील सुत्रांनी दिली आहे.
नाशिक जिल्हा कृषि विकास अधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या रासायनिक खते, बी-बियाणे व किटकनाशकांच्या खरेदी विक्रीतील गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी २४ जून ते २ जुलै या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत कृषीविभागाचे तालुका अधिकारी कृषी विस्तार अधिकारी, जिल्हास्तरावरील कृषी विकास अधिकारी व तंत्र अधिकारी यांच्यासह कृषी उपंसचालक व विभागीय कृषी तंत्र अधिकारी आदिंसह सुमारे ४८ निरीक्षकांच्या माध्यमातून कृषी सेवा कें द्रांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास साडेसात हजार नोंदणीकृत कृषी सेवा कें द्र आहेत. यातील ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्रांकडून उपलब्ध खते व बियाण्यासा साठा करून अधिक किंमतीने विक्री करण्याच्या तक्रारी शेतकºयांकडून वाढत आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना बांधापर्यंत खत पोहोचविण्याच्या प्रक्रियेत दुकानदारांना गाडी भाडे मिळत नसल्याने दुकानदारांकडून खत उपलब्ध नसल्याचा बहाणा सांगीतला जात असल्याच्या तक्रारी वाढल्यान कृषी मंत्री दादाभूसे यांनी स्वत: वेशांतर करून औरंगाबादमधील एका दुकान खत खरेदी करण्याच्या बहाण्याने प्रवेश करून वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कृषी विभागाला खडबडून जाग आली असून नाशिक जिल्ह्यात ४८ निरीक्षकांच्या देखरेखीत पुढील दहा दिवसांत जिल्हाभरातील सुमारे साडेसात हजार दुकानांतील खते, बि-बियाणे व किटकनाशकांचा साठा, विक्री व उपलब्धतेविषयी तपासणी करण्यात येणार असून या प्रक्रियेला बुधवार पासून सुरुवात झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.