चांदवड तालुक्यात बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:27+5:302021-05-28T04:11:27+5:30
------------------------------------------------------ चांदवडला कोरोना बाधित दोन दिवसात २८ नवीन रुग्ण चांदवड : येथे दि. ...
------------------------------------------------------
चांदवडला कोरोना बाधित दोन दिवसात २८ नवीन रुग्ण
चांदवड : येथे दि. २४ रोजी घेतलेल्या ५० पैकी १९ अहवाल तर दि. २५ रोजी ६१९ पैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात पॉझिटिव्ह रुग्णामध्ये सर्वाधिक रुग्ण चांदवड शहरातील विविध भागात रुग्ण आहे तर तालुक्यातील आडगाव,आसरखेडे, भयाळे, धोंडबे, गंगावे, शिरसाणो, सुतारखेडे, तिसगाव, उसवाड, वडबारे,डोणगाव, कळमदरे, राहुड,शेलु, वडनेरभैरव, वडाळीभोई एकूण २८ जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ .पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली .
------------------------------------------------------
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची भटकंती
चांदवड - खरिपाच्या हंगामाची तयारी तालुक्यात जोरदारपणे सुरू असली तरी यंदाच्या खरीप पिकासाठी लागणारे कर्ज शेतकऱ्यांना देण्यास बँका टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कर्ज घेण्याची नामुष्की ओढवली जात असल्याचे विदारक चिन्ह चांदवड तालुक्यात दिसत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाल्याने यात अधिकच भर पडली आहे. तालुक्यातील अनेक विविध कार्यकारी सोसायट्या जिल्हा बँकेच्या खातेदार आहेत .त्यामुळे विविध कार्यकारी सोसायट्या देखील जिल्हा बँक त्यांना कर्ज देत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. आता पावसाळ्यात बी बियाणे घेणे, खते घेणे ,पेरणी करणे इत्यादी मान्सून पूर्व मशागतीची कामे गतीने सुरू असून केवळ कर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी दिसत आहेत .