स्वनिर्मितीचा आनंद प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनाचा अनुभव रामनगर शाळेत आनंद मेळाव्यानिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:37 PM2018-01-06T23:37:16+5:302018-01-07T00:24:44+5:30
सायखेडा : स्वनिर्मितीचा आनंद प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनाचा अनुभव देत असल्याने शालेय जीवनात विद्यार्थीकेंद्रित अध्ययन अध्यापन पद्धतीचा अवलंब केला.
सायखेडा : स्वनिर्मितीचा आनंद प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनाचा अनुभव देत असल्याने शालेय जीवनात विद्यार्थीकेंद्रित अध्ययन अध्यापन पद्धतीचा अवलंब केला तर मुलांमध्ये सृजनशीलता आणि व्यावहारिक दृष्टिकोन निर्माण होत असतो याचा प्रत्यक्ष अनुभव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आनंद मेळाव्याचे आयोजन करून प्रत्यक्ष आर्थिक व्यवहाराचा अनुभव घेतला.
विद्यार्थ्याला पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून घेतलेले आनंददायी शिक्षण मिळाल्यास ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, स्वनिर्मितीचा आनंद मिळतो. विद्यार्थी सामाजिकदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या परिपूर्ण होतो हा अभिनव उपक्रामद्वारे सकाळी सर्व विद्यार्थी शाळेत घरातील खाद्य पदार्थ, आपल्या शेतात असलेला भाजीपाला, घरात असलेले धान्य घेऊन शाळेत आले. बाजार बसण्यासाठी घरातून पोती, बरदान घेऊन डोक्यावर भाजीपाल्याची घमेली, हातात वजन काट्याची पिशवी, गिºहायकाला सुटे पैसे देण्यासाठी काही पैसे घेऊन मुले १० वाजता शाळेत दाखल झाले. ११ वाजता मुलांनी घरी निरोप दिल्याप्रमाणे घरची माणसे, गावातील पदाधिकारी, नागरिक शाळेतील बाजारात उपस्थित झाले. अचूक रचना आणि मुलांचा उत्साह पाहून ग्रामस्थांनी घरी लागणारा भाजीपाला आणि किराणा वस्तू शालेय आठवडे बाजारात खरेदी केल्या. मुलांनी प्रत्यक्ष व्यवहार केले. पैशाच्या बदल्यात वस्तू देऊन अदान-प्रधान क्रि या अनुभवली. बेरीज, वजाबाकी, नफा-तोटा, असे व्यावहारिक उदाहरणे यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शाळेच्या उपक्र माचे ग्रामस्थ, सायखेडा केंद्र आणि परिसरातील शिक्षकांनी कौतुक केले. यावेळी शांताराम पवार,सुनील बाविस्कर, नामदेव ठाकूर, संजीव बच्छाव, सुकदेव डोंगरे, सोनाली नाठे, पवार, राजभोज आदी उपस्थित होते. आठवडे बाजार ज्या प्रमाणे भरतो त्याप्रमाणे एका रांगेत भाजीपाला, दुसºया रांगेत फळे, तिसºया रांगेत धान्य, चौथ्या रांगेत किराणा वस्तू, अशी सुबक रचना करून बाजार मांडला.अचूक रचना आणि मुलांचा उत्साह पाहून ग्रामस्थांनी घरी लागणारा भाजीपाला आणि किराणा वस्तू शालेय आठवडे बाजारात खरेदी केल्या.