ज्येष्ठ नागरिक प्रवासी स्मार्ट कार्ड सभासद मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:44 AM2019-09-25T00:44:19+5:302019-09-25T00:44:37+5:30

परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये सवलत मिळविण्यासाठी भगूरच्या ज्येष्ठ नागरिक संस्था तसेच महाराष्ट्र राज्य एसटी महामार्ग परिवहन मंडळातर्फे स्मार्ट कार्ड कार्यक्र म ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या इमारतीमध्ये संपन्न झाला.

 Senior Citizen Travel Smart Card Membership Campaign | ज्येष्ठ नागरिक प्रवासी स्मार्ट कार्ड सभासद मोहीम

ज्येष्ठ नागरिक प्रवासी स्मार्ट कार्ड सभासद मोहीम

Next

भगूर : परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये सवलत मिळविण्यासाठी भगूरच्या ज्येष्ठ नागरिक संस्था तसेच महाराष्ट्र राज्य एसटी महामार्ग परिवहन मंडळातर्फे स्मार्ट कार्ड कार्यक्र म ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या इमारतीमध्ये संपन्न झाला.
याप्रसंगी ६५ वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बसमध्ये मिळणाऱ्या सवलतीसाठी स्मार्ट कार्ड वितरित करण्यात आले. परिवहन मंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात स्मार्ट कार्ड शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी दादासाहेब देशमुख अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे, उपाध्यक्ष खंडेराव गायकवाड, सीताराम आहेर, गुलाबराव मोरे, किशोर चव्हाण, काशीनाथ उबाळे, सदाशिव सांबरे, शिवाजी घोरपडे, मारुती कोरडे, रमाकांत शेटे, सतीश गरुड, लक्ष्मण आहेर, राधाकृष्ण गामणे, त्र्यंबक करंजकर उपस्थित होते. याप्रसंगी शिवाजी बलकवडे, रतन लोट यांच्यासह परिसरातील भगूर, लहवित, नानेगाव, राहुरीगाव, दोनवाडे, बार्नस्कूल, वंजारवाडी, शेवगे दारणा, विंचुरी दळवी, पांढुर्ली, देवळाली कॅम्प विजयनगरसह ज्येष्ठ नागरिक सभासद नोंदणी करण्यात आली.
एसटी परिवहन मंडळाचे अधिकारी प्रमोद इप्पर यांनी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड डिजिटल कार्ड योजना लागू करण्यात आली असल्याचे सांगितले. वयोमर्यादा ६५ असावे, कोणत्याही बसमध्ये अर्धे तिकीट प्रवास करता येईल, ही योजना ही कॅशलेस असून त्यात पैसे टाकले आणि ते कार्ड वाहकाकडे दिले, तर त्यात पाच टक्के कॅशबॅक सूट मिळते.

Web Title:  Senior Citizen Travel Smart Card Membership Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.