नाशिक : येथील लोकमतचे वरीष्ठ उपसंपादक गणेश कृष्णाराव धुरी (37) यांचे बुधवारी रात्री साडे दहा वाजता अपघाती निधन झाले.नवापूर येथे एका नातेवाईकचा अंत्यविधी आटोपून परतीचा प्रवास करताना चितेगाव फाटा येथे त्यांच्या स्विफ्ट कारला उसाच्या भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत धुरी यांच्या डोक्याला जबर मार लागला तसेच संतोष कासार हे देखील जखमी झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन भाऊ, पाच बहिणी, मुलगा असा परिवार आहे.
जखमी अवस्थेत धुरी यांना प्रथम आडगावनाक्यावरील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून जिल्हा रुग्णालयात हलविले असता अतिदक्षता विभागात डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. त्यांच्या निधनाची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या मित्र परिवाराने जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. उद्या गुरुवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात नाशिक अमर धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येनार आहे.