रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली नाशिकरोड स्थानकावरील कामांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2016 12:38 AM2016-07-10T00:38:52+5:302016-07-10T00:57:46+5:30

स्लाईड शो : प्रवासी संघटना, व्यापाऱ्यांनी मांडल्या विविध सूचना

Senior officers of the railway informed about work on Nashik Road station | रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली नाशिकरोड स्थानकावरील कामांची माहिती

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली नाशिकरोड स्थानकावरील कामांची माहिती

googlenewsNext

नाशिकरोड : रेल्वे भुसावळ मंडळ विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकांत रेल्वे प्रवासी संघटना, मालधक्का व्यापारी, रोटरी क्लब, महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स यांना गेल्या दोन वर्षात रेल्वे प्रशासनाने केलेली कामे व भविष्यात करण्यात येणारी कामे याबाबत स्लाईड शोद्वारे माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी सोयी-सुविधाबाबत विविध सुचना मांडल्या.
संपूर्ण भारतात रेल्वे प्रशासनाकडून गेल्या दोन वर्षात केलेली कामे व भविष्यात करावयाची कामे याबाबत विविध ठिकाणी स्लाईड शोद्वारे माहिती दिली जात आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकात शनिवारी सकाळी रेल्वे भुसावळ मंडळाचे अतिरिक्त प्रबंधक अरूण धार्मिक, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक एस.के. मिश्रा, वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता एन.जे. निमसे, रेल्वे सुरक्षा दल मंडळ आयुक्त सी.एम. मिश्रा, स्टेशन प्रबंधक एम.बी. सक्सेना आदिंनी रेल्वे प्रशासनाने दोन
वर्षात केलेली कामे व भविष्यात करण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन, प्रयोजन याबद्दल सविस्तर माहिती दिली.
यावेळी उपस्थितांनी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर सरकता जिना, लिफ्ट बसवावी, लोडिंग-अनलोडिंगची सुविधा वाढवावी, सुरक्षितेबाबत घ्यावयाची काळजी, वाहनतळाचा प्रश्न मार्गी लावावा, स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमण, स्वच्छता आदि सूचना केल्यात. यावेळी क्षेत्रिय रेल्वे उपभोगता परिषद सदस्य दिग्विजय कपाडिया, चंद्रकांत दीक्षित, रोटरी क्लबचे डॉ. प्रशांत भुतडा, संजय कलंत्री, रेल्वे परिषद सदस्य नितीन चिडे, मालधक्का व्यापारी शिवनारायण सोमाणी, गुल्लीशेठ आनंद, रेल्वे परिषद उपाध्यक्ष विजय आर्या, महेंद्रा लॉजिस्टिक कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक निंबा भामरे, ऋषिकेश विध्वंस आदि उपस्थित होते.

Web Title: Senior officers of the railway informed about work on Nashik Road station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.