विंचूर : येथील ग्रामपंचायतीच्यावतीने कर्मवीर विद्यालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.येथे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तरी काही रुग्ण घरीच होम आयसोलेशन होतात. मात्र, काही रुग्णांची घरे लहान असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र रुम नसतात. त्यामुळे घरी विलगीकरणाला अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे त्या कुटुंबात परत रुग्ण संख्या वाढत असल्याने विंचूर ग्रामपंचायतीने गावातील कर्मवीर विद्यालयामध्ये कोरोना रुग्णांचे विलगीकरण करण्याचे नियोजन केले आहे. रुग्णाला १४ दिवस विलगीकरण कक्षातच क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
विंचूर ग्रामपालिकेतर्फे विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 11:41 PM