नाशिक : शहर व जिल्हाभरातून सुमारे सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी व्यवसाय व्यवस्थापन विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली एमएएच-एमबीए/एमएमएस सीईटी परीक्षा दिली.एमबीएच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा आवश्यक करण्यात आली आहे. या परीक्षेशिवाय अभ्यासक्रमास प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे नाशिकमधून ७ हजार ४०० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. तर सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी एमबीएच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊशकतो.एमबीए सीईटीत चार विषयांवर एकूण २०० प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे २०० गुणांसाठी ही परीक्षा झाली. लोकल रिजनिंग (७५ प्रश्न), अॅबस्ट्रॅक्ट रिजनिंग (२५ प्रश्न) क्वॉँटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड (५० प्रश्न) आणि व्हर्बल अॅबिलिटी (५० प्रश्न) याप्रमाणे परीक्षा पार पडली.
एमबीएसाठी सात हजार विद्यार्थ्यांनी दिली सीईटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:51 AM