कसबे सुकेणे, ओझर बाजारपेठांमध्ये मंदी

By Admin | Published: November 12, 2016 10:05 PM2016-11-12T22:05:45+5:302016-11-12T22:12:20+5:30

कसबे सुकेणे, ओझर बाजारपेठांमध्ये मंदी

Shake the town, recession in the Ozar market | कसबे सुकेणे, ओझर बाजारपेठांमध्ये मंदी

कसबे सुकेणे, ओझर बाजारपेठांमध्ये मंदी

googlenewsNext

कसबे सुकेणे : परिसरातील विविध बँकांमध्ये पाचशे आणि हजारच्या नोटा बदलविण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी ग्राहकांची गर्दी कायम असून, काम-धंदे सोडून नागरिक बँकांपुढे रांगा लावत नोटा बदलविण्याची दिवस घालवत आहेत. तालुक्यातील सुकेणे, सायखेडा, ओझर या बाजारपेठांमध्ये मंदी पसरली आहे़
हजार आणि पाचशेच्या नोटा बदलामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यव्यस्था पुरती कोलमडली असून, व्यवहार ठप्प झाले आहे. एटीएम बंद, हजार आणि पाचशे नोटाचा प्रश्न, शंभरच्या नोटांची टंचाई आणि सुट्यांवरून होणारे वाद याचे पडसाद या भागातील बाजारपेठांवर होत असून, बाजारात मंदीचे सावट दिसत आहे़
मजूर आणि सर्वसामान्य बांधवांना हजार आणि पाचशे नोटांचे सुटते करण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असून, पेट्रोल पंपांवर कितीचे पेट्रोल टाकायचे, हा प्रश्न आहे.
अनेकांना केलेल्या कामाचे पेमेंट मिळत नसल्याने व्यव्यहार ठप्प झाले आहेत. अनेकांनी आज कामावर दांडी मारत बँकांपुढे नोटा बदलविण्यात दिवस घालविला. बँकांनी काही ठिकाणी ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली सर्व राष्ट्रीयीकृत बँकांपुढे शनिवारी लांबच लांब रांगा होत्या़ (वार्ताहर)

Web Title: Shake the town, recession in the Ozar market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.