नाशिक : इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट्स आॅफ इंडियाच्या नाशिकसीए शाखेतर्फे आयसीएआय भवन येथील दोनदिवसीय प्रादेशिक कर परिषदेची रविवारी (दि.२३) सांगता झाली.या प्रादेशिक परिषदेच्या पहिल्या दिवशी सीए किशोर कारिया यांनी शेअर्सवरील भांडवल मिळकत कर आणि शेअर्समधील पेनी स्टॉक व्यवहारांमध्ये असलेल्या अलीकडील तरतुदीविषयी मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात मुंबई येथील सीए राजेंद्र जैन यांनी कलम ५६ आणि कलम ६८ मधील तरतुदीविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर सीए अभिजित मोदी यांनी कलम बीबीडीए आणि अन्य करांचे विशेष दर या विषयावर उपस्थिताना मार्गदर्शन केले.परिषदेच्या अंतिम सत्रात सीए समीर कापडिया यांनी जीएसटीमधील अलीकडील तरतुदींवर प्रकाश टाकला. यावेळी नाशिक शाखेचे अध्यक्ष मीलन लुणावत, उपाध्यक्ष रेखा पटवर्धन, सचिव रणधीर गुजराथी, खजिनदार हर्षल सुराणा, राजेंद्र शेटे, रवि राठी, विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष रोहन आंधळे, पश्चिम विभागीय कार्यकारिणीचे सदस्य विक्रांत कुलकर्णी आदी सीए उपस्थित होते.संकल्पना आणि व्याप्तीदुसºया दिवशी दिल्लीच्या तज्ज्ञ अर्चना जैन यांनी जीएसटी वार्षिक रिटर्न्स आणि आॅडिट फॉर्म आणि त्या संदर्भात असलेले संबंधित इनपूट टॅक्स क्रेडिट या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सीए दीपक ठक्कर यांनी जीएसटी आॅडिट वैधानिक तरतुदी संकल्पना आणि व्याप्ती या विषयावर माहिती व मार्गदर्शन केले.
शेअर्सवरील भांडवल, मिळकत कर विषयांवर मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:59 PM