‘ती’ बस पोलिसांनी शिताफीने पकडली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:26 PM2020-03-14T12:26:11+5:302020-03-14T12:26:18+5:30

वणी : नाशिक येथून येणाऱ्या युवकाच्या दुचाकीला धडक देऊन फरार झालेली एस टी बस पोलिसांनी शिताफीने पकडली असून एस टी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 'She' bus caught by police! | ‘ती’ बस पोलिसांनी शिताफीने पकडली !

‘ती’ बस पोलिसांनी शिताफीने पकडली !

googlenewsNext

वणी : नाशिक येथून येणाऱ्या युवकाच्या दुचाकीला धडक देऊन फरार झालेली एस टी बस पोलिसांनी शिताफीने पकडली असून एस टी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  वीस वर्षीय युवक कामानिमित्त नाशिक येथे गेला होता. कामे आटोपुन दुचाकीवर परतीच्या प्रवासात दिंडोरी नाशिक रस्त्यावरील वनारवाडी शिवारात सदरची दुचाकी आली असता नाशिककडे जाणार्या भरधाव वेगातील एस टी बसने या दुचाकीला धडक दिल. अपघाताची माहिती पोलीसांना न देता तसेच जखमीला कोणतीही वैद्यकीय मदतीसाठी प्रयत्न न करता घटना स्थळावरु न एस टी चालक वाहन घेऊन फरार झाला होता. सदर अपघाताची माहिती दिंडोरी पोलीसांना समजली त्या दरम्यान गंभीर जखमी दिंडे या युवकाला नाशिकच्या खाजगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या दरम्यान सुटीवर असलेले दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलीसांना सुचना दिल्या. वाघ , आव्हाड , जाधव व इतर सहकाऱ्यांनी माहिती घेतली. त्यात सदर एस टी जुन्या सिबीएस येथे असल्याची माहिती मिळाली.तेथे हे पथक गेले एमएच १४ बीटी ३६१९ ही एस टी असल्याची बाब तपासात निष्पन्न झाली. प्रारंभी वाहनचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र तपासाची दिशा व अपघातग्रस्त एस टी ची माहिती दिली. तेव्हा नंदकिशोर पवार राहणार. मांदाणे याने अपघात करु न फरार झाल्याची कबुली दिली.अधिक तपास पोलीस निरीक्षक बोरसे अधिक तपास करत आहेत.

Web Title:  'She' bus caught by police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक