टमाट्याच्या शेतात सोडल्या मेंढ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 06:25 PM2018-09-27T18:25:17+5:302018-09-27T18:26:14+5:30
मिरची, टमाटे, कोबी कोथिंबीर आदी पालेज्यांना बाजारात भाव नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातून पीक काढण्याऐवजी ते मेंढ्यांना खाण्यासाठी दिले आहे. अनेक शेतांमध्ये टमाटे खाण्यासाठी मेंढ्यांना सोडण्यात आले आहे.
औंदाणे : मिरची, टमाटे, कोबी कोथिंबीर आदी पालेज्यांना बाजारात भाव नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातून पीक काढण्याऐवजी ते मेंढ्यांना खाण्यासाठी दिले आहे. अनेक शेतांमध्ये टमाटे खाण्यासाठी मेंढ्यांना सोडण्यात आले आहे.
सध्या सर्वत्र उकाडा जाणवत आहे. तर मध्यंतरी ढगाळ वातावरण असूनही पाऊस नाही तर बाजारात शेतकºयांच्या भाजीपाला पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी टमाटा उकिरड्यावर फेकत आहे. तर टमाट्याच्या उभ्या पिकांमध्ये मेंढ्या सोडण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. यावर्षी पाऊस अत्यल्प असून, पिके पोसली गेली नाही तर पिकांची वाढ खुंटून उत्पनात घट झाली होती. शेतकºयांनी जेमतेम पाण्यावर घेतलेल्या टमाटे, कांदा, कोबी, कोथिंबीर, मेथी, मिरची यांसारख्या प्रमुख भाजीपाला शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकºयाची आर्थिक परिस्थिती संपूर्ण खालावली आहे.
हातात येणारे पीक वाया गेले आहे. आर्थिक गणित चुकल्या मागे पडलेला बाजारभाव हेच प्रमुख कारण आहे, अशी म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे. शेतमाल चांगल्या प्रकारे पिकवितो आणि विकण्याची वेळ येते तेव्हा कवडीमोल बाजारभाव मिळतो. बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजुरीचा खर्च सुटणे कठीण झाले आहे. शेतीत कमविले यापेक्षा किती गमविले याचे गणित जुळत नाही. सद्य परिस्थितीत मिरची, टमाटे, कोबी, कोथिंबीर बाजारात विकण्यासाठी गेले असता भाडेही वसूल होत नाही. गाडी भाडे, मजुरी घरातून द्यावी लागत आहे. पिके कोणती घ्यावी या संकटात शेतकरी वर्ग सापडला आहे.