देशभरात मोदीविरोधी वातावरण आहे आणि ग्रामीण भागात तर ते अधिक तीव्रतेने जाणवते आहे. मोदी सरकारच्या निर्णयांमुळे प्रत्येक क्षेत्रात पीडा आहे. या देशातील निवडणुकीचे मोठे कौतुक वाटते. कन्याकुमारीचा माणूस जो विचार करतो तोच काश्मीरचाही करतो. त्यातून अनेक लाटा आल्या गेल्या. सामान्य माणूस आपला राग मतपेटीतून व्यक्त करेल, अशी खात्री आहे.सेना-भाजपा युती झाल्यामुळे महाआघाडीला फटका बसेल काय?युती झाली नसती तर विरोधी पक्षांची मते शिवसेनेने घेतली असती. तसेही निवडून आल्यानंतर त्यांनी काय केले असते, ते देवाला माहीत. सत्तेत राहून त्यांनी जी विरोधी पक्षाची भूमिका निभावली होती, ती भाजपाविरोधी मते आता शिवसेनेला मिळणार नाहीत. लोकांनाही माहीत झाले आहे. म्हणतात ना, इंद्राय स्वाहा... तक्षकाय स्वाहा... मोदींना विरोध म्हणून शिवसेनाही स्वाहा... अशीच सारी परिस्थिती आहे.तुमच्या मते सध्या देशात काय वातावरण आहे?निवडणूक एकतर्फी होणार नाही, हे नक्की. ग्रामीण भागात मोदी विरोधी वातावरण आहे. प्रश्न शहरी भागाचा आहे. परंतु, डॉक्टर्स, बिल्डर्स, वकील असे अनेकजण त्रस्त आहेत. एकाला एक न्याय, दुसऱ्याला वेगळा न्याय. सामान्य माणूस बोलत नाही; परंतु तो मतपेटीतून व्यक्त होईल.मनसेला आघाडीत घेण्याबाबत नेमकी काय भूमिका आहे?राज ठाकरे पूर्णपणे मोदीविरोधी भूमिका घेत आहेत. मोदींनी देशाचेवाटोळे केले असल्याने मी मोदी विरोधात बोलत राहणार, असा त्यांनी पवित्रा घेतलेला आहे. मात्र, त्यांनी आघाडीत येण्यासाठी एकही जागा मागितलेलीनाही.वंचित बहुजन आघाडीच्या सभांना चांगली गर्दी होताना दिसते आहे. त्याचा काही परिणाम जाणवेल?गर्दी होते आहे; परंतु मुस्लीम समाज इकडे-तिकडे जाणार नाही. आठवलेंचा प्रभाव कमी झाल्याने दलितांचा एक गट तिकडे सरकला आहे. मोदी हटाव हेच सर्वांचे ध्येय असल्याने प्रकाश आंबेडकरांना मी नाशिकची जागाही देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु त्यांनी २२ जागा घोषित केल्या. उर्वरित जागांमध्ये मित्रपक्षांना सामावून घेऊन आमच्या हाती काय उरणार?जातीय मुद्दा चालणार नाहीजातीय मुद्दा आता चालणार नाही. कारण मराठा आरक्षण मिळाले आहे. लोकही आता सजग आणि सुजाण झाले आहेत. पवारसाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायचे आहे.आघाडीचे६०% उमेदवार निश्चितआघाडीचे ६० टक्के उमेदवार निश्चित झालेले आहेत. त्यात कोल्हापूर, माढा, बारामती, शिरुर, नाशिक, दिंडोरी, मुंबईतील जागांचा समावेश आहे. आम्ही कामाला लागलो आहोत. सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड साधन सामग्री आहे. त्यामुळे केवळ मनुष्यबळाच्या आधारे काम सुरू केले आहे आणि त्यात आम्ही यशस्वी होऊ.ईव्हीएम मशीनईव्हीएम मशीनचे म्हणाल तर, अमेरिकेत बसलेल्या शुजाने सांगितलेले भयावह आहे आणि अमेरिकेने त्याला कोर्टाच्या आदेशान्वये संरक्षण दिले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीतही त्याने खुलासा केला आहे. मुंडेंच्या अपघाताप्रकरणी कोणावरही कारवाई न झाल्याने महाराष्ट्रातील लोक संशय व्यक्त करत आहेत.
‘युती’मुळे शिवसेनेचे नुकसानच होणार!
By धनंजय वाखारे | Published: March 10, 2019 1:47 AM
देशभरात मोदीविरोधी वातावरण आहे आणि ग्रामीण भागात तर ते अधिक तीव्रतेने जाणवते आहे. मोदी सरकारच्या निर्णयांमुळे प्रत्येक क्षेत्रात पीडा आहे. या देशातील निवडणुकीचे मोठे कौतुक वाटते. कन्याकुमारीचा माणूस जो विचार करतो तोच काश्मीरचाही करतो. त्यातून अनेक लाटा आल्या गेल्या. सामान्य माणूस आपला राग मतपेटीतून व्यक्त करेल, अशी खात्री आहे.
ठळक मुद्दे‘मोदी हटाव’ हीच सर्वांची भूमिका : भुजबळ