इंधन दरवाढीविरुद्ध शिवसेनेचे धरणे केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा : आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 01:11 AM2021-02-06T01:11:48+5:302021-02-06T01:12:07+5:30

नाशिक : केंद्र सरकारने इंधनाबरोबरच घरगुती वापराच्या गॅसच्या किमतीत केलेल्या भरमसाठवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

Shiv Sena's protest against fuel price hike Central government's protest announcement: warning of agitation | इंधन दरवाढीविरुद्ध शिवसेनेचे धरणे केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा : आंदोलनाचा इशारा

इंधन दरवाढीविरुद्ध शिवसेनेचे धरणे केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा : आंदोलनाचा इशारा

Next

नाशिक : केंद्र सरकारने इंधनाबरोबरच घरगुती वापराच्या गॅसच्या किमतीत केलेल्या भरमसाठवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजेपासून या धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी विविध घोषणा लिहिलेले फलक झळकविले तर काहींनी गाजराची माळ गळ्यात घातली होती. दिवसभर चाललेल्या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल व गॅसवरील भाव मोठया प्रमाणात वाढवले आहे. या भाववाढीमुळे कोरोना प्रादुर्भावामुळे अगोदरच हैराण व बेजार असलेल्या जनतेच्या हाल अपेष्टात अधिकच भर पडलेली आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस भाववाढीमुळे अनेक जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीतदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अश्यातच घरगुती गॅसवरील अनुदानदेखील केंद्र सरकारने दिलेले नाही. अगोदरच घटलेले उत्पन्न, गमावलेला रोजगार या परिस्थितीत दैनंदिन चरितार्थ चालवणे आजमितीस सर्वसामान्य कुटुंबाला अतिशय अडचणीचे झालेले आहे. वाढत्या महागाईने दैनंदिन जीवनच विस्कळीत झाले असून, नकारात्मक परिस्थितीला कंटाळून अनेकांनी आपले जीवन देखील संपवले आहे, ही वस्तुस्थिती आहे. केंद्र शासन सामान्य जनतेला दिलासा देऊ शकते, मात्र हे शासन दिवसोंदिवस किमती वाढून सामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. शिवसेना केंद्र सरकारच्या या कृतीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत असून, या आंदोलनानंतरही केंद्र शासनाला जाग न आल्यास अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात वसंत गिते, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, देवानंद बिरारी आदी सहभागी झाले होते.

Web Title: Shiv Sena's protest against fuel price hike Central government's protest announcement: warning of agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.