संजय पाठक, नाशिक: सत्तेसाठी पक्षांतरे केली जात असताना मात्र पक्षात राहून आलेले कटू अनुभव आणि सध्या सुरू असलेले डर्टी पॉलिटिक्स यामुळे यापुढे शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि सध्या राष्ट्रवादीत असलेले ऍड. शिवाजी सहाणे यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऍड. सहाणे हे 2012 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून निवडून आले होते यादरम्यान त्यांनी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली होती. त्यात ते चर्चेत आले होते.
समसमान मते असताना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या जयंत जाधव यांच्या बाजूने चिठ्ठीचा कौल देण्याच्या वादग्रस्त निर्णयाने त्यांचा पराभव झाला आणि राष्ट्रवादीच्या जयंत जाधव हे विजयी झाले होते त्यानंतर ऍड. सहाणे यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन जयंत जाधव आणि राष्ट्रवादीला जेरी सांडले होते दरम्यान 2018 मध्ये त्यांनी हीच विधान परिषदेची निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे त्यावेळी ईडीच्या कोठडीत असल्याने आणि मावळते आमदार जयंत जाधव यांनी उमेदवारी करण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादी कडून ही निवडणूक लढवली होती. यात शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले होते.
मात्र त्यानंतर राजकीय वातावरण बदलले. राजकीय बदल अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतरही झालेले दुर्लक्ष त्यामुळे राजकीय पक्षांसाठी सर्वस्व देऊनही त्यांच्याकडून कटू वागणूक दिली जाते, असा अनुभव ऍड सहाणे यांनी कथन केला आणि त्यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे.