ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील विश्रामगड विकास मंडळाच्यावतीने विश्रामगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवपदस्पर्शदिन साजरा करण्यात आला. या गडावर २२ नोव्होंबर १६७९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेट देऊन गडावर १७ दिवस मुक्काम केला होता. आज या घडनेला ३३९ वर्ष पूर्ण होत असून विश्रामगड विकास मंडळाच्या वतीने शिवपदस्पर्श दिन उत्साहात साजरा करण्यात आला.शिवपदस्पर्श दिना निमित्ताने ठाणगाव येथून सकाळी सजवलेल्या रथामधून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. रथाचे पूजन विश्रामगड मंडळाचे अध्यक्ष नामदेव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते ए. टी. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विश्रामगडावर जाऊन गड देवता, आंबा-निंबा व पट्टाई देवीचे पूजन करण्यात आल. अंबारखान्याजवळील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात येऊन आरती करण्यात आली. गडावर अकोले अहमदनगर, नाशिक, धुळे, मुंबई, पुणे येथील हजारो शिवप्रेमींनी हजेरी लावून गडावर ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणानी गड दुमदुमून निघाला होता.
शिवपदस्पर्श दिनानिमित्त विश्रामगडावर शिवरायांचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 5:40 PM