सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व उत्तर महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर यंदाहीे विश्व कल्याणासाठी व विश्वशांतीसाठी श्री महंत विष्णूदास महाराज यांनी शिवशक्ती महायज्ञ व रामकथेचे आयोजन केले आहे.या महायज्ञाला उज्जैन, गूजरात, आयोध्या, सूरत, ग्वाल्हेर, होशंगाबाद, हरीद्वार, त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर, शिवपूरी, कोटा, वाशिम, राजस्थान, रतलाम, वृंदावन आदी ठिकाणचे संत-महंत हजेरी लावत आहे. सायंकाळी ६ वाजता श्रीराम कथा ग्रथांची साधु- महंताच्या उपस्थितीत गावातून ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी यात्रा मार्गावर सडश, रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विष्णूदास महाराजांनी पुष्पगुच्छ देऊन साधू-महंताचे स्वागत केले.सप्तशृंगगडावरील भक्तागंण हॉल येथे सुरू असलेल्या या कार्यक्र मात शिवशक्ती महायज्ञ, श्री दूर्गा सप्तशती पाठ, सहस्त्रचंडी, रूद्रचंडी, रूद्राभिषेक आदी धार्मिक कार्यक्र म होत आहेत. श्री कमलेश महाराज (उज्जैन) राम कथेचे वाचन करत आहेत. या विविध धार्मिक कार्यक्र मामुळे गडावरील भक्तीमय वातावरणात वाढ झाली आहे. या कार्यक्र मात विशेष उत्सव म्हणून शिव विवाह, श्रीराम जन्म, श्रीराम विवाह, राष्ट्रीय संत संमेलन आदी कार्यक्र म आयोजित करण्यात आले आहे.रामकथा श्रवणासाठी पंचक्र ोशीतील ग्रामस्थ व गडावरील हजारो नागरिकांची गर्दी होत आहे. विविध भागातून दर्शनासाठी येणारे भाविकही या कथेचा लाभ घेतांना दिसत आहे. २६ मे पासुन ह्या कार्यक्र माचा प्रारंभ झाला असून एक जून पर्यंत हा महायज्ञ चालणार आहे.
सप्तशृंगगडावर शिवशक्ती महायज्ञास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 6:04 PM
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व उत्तर महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर यंदाहीे विश्व कल्याणासाठी व विश्वशांतीसाठी श्री महंत विष्णूदास महाराज यांनी शिवशक्ती महायज्ञ व रामकथेचे आयोजन केले आहे.
ठळक मुद्देश्रीराम कथा ग्रथांची साधु- महंताच्या उपस्थितीत गावातून ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा