२१०० झाडांच्या वृक्षारोपणाच्या संकल्पाने शिवस्वराज्य दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:17 AM2021-06-09T04:17:01+5:302021-06-09T04:17:01+5:30
सिन्नर: शिवस्वराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वडांगळी ग्रामपंचायतीने भगवा ध्वज आचारसंहिता पाळून शिव स्वराज्य दंड गुढी उभारून २१०० झाडे ...
सिन्नर: शिवस्वराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वडांगळी ग्रामपंचायतीने भगवा ध्वज आचारसंहिता पाळून शिव स्वराज्य दंड गुढी उभारून २१०० झाडे लोक सहभागातून लावण्याचा संकल्प करत सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे व त्यांच्या पत्नी सुनीता मुरकुटे यांच्या हस्ते शुभारंभ केला.
सकाळी सुदेश खुळे यांच्या हस्ते शिव छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार तर आनंदा आढांगळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. उर्वरित सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सरपंच योगेश घोटेकर यांनी शिव स्वराज्य दंड गुढी उभारून शिव छत्रपतींच्या नावाचा गजर केला. उपसरपंच गायत्री खुळे यांनी विधिवत गुढीचे पूजन यावेळी केले. त्यानंतर शिवशंभो चौकात मुरकुटे दाम्पत्याच्या हाताने वृक्षारोपणाचा शुभारंभ करून ज्येष्ठांच्या हाताने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच योगेश घोटेकर, उपसरपंच गायत्री खुळे, सुदेश खुळे, गोपाळराव खुळे, शिवाजी खुळे, भागवत खुळे, रामनाथ खुळे, दिनकर खुळे, आनंदा आढांगळे,भीमराव आढांगळे, विकास संस्थेचे चेअरमन शरद खुळे,नानासाहेब खुळे आदी उपस्थित होते.
-----------------------------------------
लोकसहभाग गावच्या विकासाची ताकद
वाढदिवसानिमित्त अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतमध्ये वृक्षारोपणासाठी रोख पैसे दिले असून त्या व्यतिरिक्त २१०० झाडांच्या स्वरूपात ग्रामस्थांनी मदत केली आहे. ह्या झाडांची किंमत सुमारे ५ लक्ष रुपये आहे.
-योगेश घोटेकर, सरपंच
--
वडांगळी गावचा लोकसहभाग इतरांसाठी आदर्श
कोविड सेंटर, ग्रामस्वच्छता व त्यानंतर आता वृक्षारोपण यामध्ये वडांगळीकरांनी दाखवलेला लोकसहभाग हा इतरांसाठी आदर्श असून आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल आहे. ह्या सर्व गोष्टींमध्ये प्रत्येक पावलात गावकऱ्यांच्या सोबत आहे. -माणिकराव कोकाटे, आमदार
--------
लोकसहभागातून मिळालेली झाडे..
खाया ३५०, सप्तपर्णी ३००, स्पेतुडिया १००. कदंबा २५०, रेन ट्री १००. काशिद २००, अशोका २००, सिल्व्हर ओक २००, पाम १००. आकिश २००, बावा १००.
------------------------
फोटो ओळी- वडांगळी येथे लोक सहभागातून २१०० झाडे लावण्याचा संकल्प करत सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे व त्यांच्या पत्नी सुनीता मुरकुटे यांच्या हस्ते शुभारंभ केला. त्याप्रसंगी सरपंच योगेश घोटेकर, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ. (०७ सिन्नर १)
===Photopath===
070621\07nsk_2_07062021_13.jpg
===Caption===
०७ सिन्नर१