नेमबाजी स्पर्धेत हर्षवर्धनला पाच सुवर्णांसह १३ पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 06:49 PM2018-12-09T18:49:05+5:302018-12-09T18:53:23+5:30
नाशिक : नॅशनल रायफल असोसिएशन आॅफ इंडियातर्फे दिनांक १५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१८ रोजी त्रिवेंद्रम येथे आयोजित ६२ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या १४ वर्षीय नाशिकच्या हर्षवर्धन यादवने ५ सुवर्ण, २ रौप्य, ६ ब्राँझ अशी एकूण १३ पदकांची कमाई केली.

हर्षवर्धनने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात २ सुवर्ण, २ रौप्य आणि २ ब्राँझ; तर २५ मीटर स्पोर्टस पिस्तूल प्रकारात २ सुवर्ण, २ ब्राँझपदके पटकावली. २५ मीटर स्टॅण्डर्ड पिस्तूल प्रकारात त्याने १ सुवर्ण आणि २ ब्राँझपदके मिळविली. या स्पर्धेत सर्वात कमी वयाचा यशस्वी खेळाडू म्हणून हर्षवर्धन यादवने बहुमान प्राप्त केला आहे. बालेवाडी येथे गगन नारंग स्पोर्ट फाऊंडेशनमध्ये नेमबाजीचे तो प्रशिक्षण घेत आहे.