दुकानांची वेळ सकाळी ९ ते रात्री ९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 11:39 PM2020-10-14T23:39:49+5:302020-10-15T01:41:13+5:30
नाशिक: अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानांची वेळ सारखी असावी म्हणून गुरूवार (दि.१५) पासून जिल्'ातील दुकानांच्या वेळा या सकाळी ९ ते रात्री ९ अशी असणार आहे. याबाबतचा अद्यादेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाने बुधवारी (दि.१४) जाहिर केलेल्या अधिसुचनेनतील तरतुदींनुसार वेळांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
नाशिक: अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानांची वेळ सारखी असावी म्हणून गुरूवार (दि.१५) पासून जिल्'ातील दुकानांच्या वेळा या सकाळी ९ ते रात्री ९ अशी असणार आहे. याबाबतचा अद्यादेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाने बुधवारी (दि.१४) जाहिर केलेल्या अधिसुचनेनतील तरतुदींनुसार वेळांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वेळोवेळी आवश्यकतेनुसार दुकानांच्या वेळांमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे. परंतु यामुळे बºयाचदा गोंधळाची देखील परिस्थिती निर्माण होते. प्रशासकीय दृट्या दुकानांच्या वेळा आणि गर्दीवरील नियंत्रणासाठी देखील गैरसोयीचे होत असल्याने शाासनाने दिलेल्या आधिसुचनेवरून जिल्'ांच्या दुकानांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने,हॉटेल्स, बार, मद्य विक्री करणारी दुकाने यांची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी राहाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केले आहे. यापूर्वी जिल्'ात दुकानांसाठी सकाळी ७ ते रात्री ८ अशी वेळ होती.
मद्य विक्री करणारी हॉटेल्स,बार सकाळी ११ ते रात्री ९ अशा वेळेत सुरू होते. मद्य विक्री न करणारी हॉटेल्स सकाळी ८ ते ९ तसेच वाईन शॉप साठी सकाळी ९ ते सायंकाळी ७ अशी वेळ होती. त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार सर्व संबंधितांशी चर्चा करून वेळा निश्चित करण्यात आलेल्या होत्या.
शासनाने बुधवारी जाहिर केलेल्या अधिसूचनेच्या परिच्छेड क्रमांक ५ मध्ये दिलेल्या सूचनांचा विचार करून तसेच या संदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ तसेच पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक या सर्वांशी चर्चा करून, आता या संदभार्तील यापूवीर्चे सर्व आदेश रद्द करून सर्व आस्थापनासाठी एकसमान सकाळी ९ ते रात्री ९अशी वेळ गुरूवारपासून निश्चित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
जीवनावश्यक बाबींच्या आस्थापनासाठी वेळेची कोणतीही मयार्दा राहणार नाही. कंटेनमेंट झोनमधील आस्थापना साठी पूर्वीच्याच वेळेच्या मयार्दा व अन्य नियम कायम राहतील.