सील केलेले हॉटेलसह दुकान पुन्हा सुरू, मनपाच्या कारवाईविषयी शंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:14 AM2021-04-18T04:14:12+5:302021-04-18T04:14:12+5:30
दरम्यान,अशाच प्रकारे एका कपड्याच्या दालनावरही महापालिकेच्या पश्चिम विभागाने कारवाई केली होती. मात्र, नंतर आता अचानक हॉटेलचे सील काढून घेण्यात ...
दरम्यान,अशाच प्रकारे एका कपड्याच्या दालनावरही महापालिकेच्या पश्चिम विभागाने कारवाई केली होती. मात्र, नंतर आता अचानक हॉटेलचे सील काढून घेण्यात आले असून, या हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेषत: जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आरोग्य नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापना कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत सील ठेवण्याचे आदेश असताना अचानक हॉटेलचे सील काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हॉटेलचालकाने माफीनामा सादर केल्याने हॉटेलचे सील काढण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
कोट...
राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांना पार्सल सेवेची परवानगी दिली आहे. त्याच प्रमाणे हॉटेल चालू न केल्यास कामगारांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हॉटेलला शासनाच्या नियमानुसार पार्सल सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे.
- सुरेश खाडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
महापालिकेने हॉटेल सील केले होते. मात्र,