दुकाने बंद, टपऱ्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:15 AM2021-04-09T04:15:27+5:302021-04-09T04:15:27+5:30
नाशिक : इंदिरानगर भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ व दुकाने बंद असले तरी परिसरातील पानटपऱ्या मात्र सुरूच आहेत. अनेक ...
नाशिक : इंदिरानगर भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ व दुकाने बंद असले तरी परिसरातील पानटपऱ्या मात्र सुरूच आहेत. अनेक टपऱ्यांवर अवैधरीत्या गुटखा अथवा सुगंधित तंबाखूची विक्री सुरूच आहे. काही पानटपरीधारक टपरीजवळ थांबून येणाऱ्या ग्राहकांना तंबाखू व अन्य अमली पदार्थांची विक्री करीत आहेत.
भाजी विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन
नाशिक : इंदिरानगर भागात भाजी विक्रेत्यांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. रथचक्र परिसर व अश्वमेध परिसरात भाजी विक्रेत्यांकडून मास्क आणि सॅनिटायझरसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्याने, कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
कर्ज हप्ते स्थगित करण्याची मागणी
नाशिक : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केल्याने, अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहे. अशा व्यावसायिकांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा नागरिकांना गृह कर्जासह विविध प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, राज्य सरकारने बँकांना सूचना करून कर्ज हप्ते स्थगित करण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे.