अल्पबचत महिला प्रतिनिधीचे ५४ हजार लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 05:02 PM2018-08-07T17:02:39+5:302018-08-07T17:02:58+5:30

सिन्नर : येथील टपाल कार्यालयातील महिला अल्पबचत प्रतिनिधिचे ५४ हजार लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात महिला चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The short-lived women's representative stretched up to 54 thousand | अल्पबचत महिला प्रतिनिधीचे ५४ हजार लांबविले

अल्पबचत महिला प्रतिनिधीचे ५४ हजार लांबविले

Next
ठळक मुद्देमागे उभ्या असलेल्या दोन अज्ञात महिलांनी बलक यांच्या हातातील कापडी पिशवीतून ५४ हजारांची रोकड लंपास केली.



सिन्नर : येथील टपाल कार्यालयातील महिला अल्पबचत प्रतिनिधिचे ५४ हजार लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात महिला चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांताबाई मुरलीधर बलक (७०, रा. खळवाडी, डॉ. आंबेडकरनगर) या अल्पबचत प्रतिनिधी म्हणून काम करतात. बलक दरमहिन्याला भरणा करण्यासाठी येथील नगरपरिषद कार्यालयासमोरील पोस्ट कार्यलयात जात असतात. सोमवारी देखील त्या पोस्ट कार्यलयात रांगेत उभे होत्या. मागे उभ्या असलेल्या दोन अज्ञात महिलांनी बलक यांच्या हातातील कापडी पिशवीतून ५४ हजारांची रोकड लंपास केली. काऊण्टरजवळ गेल्यावर पैसे चोरीला गेल्याचे बलक यांच्या निदर्शनास आले. त्यानी आरडाओरड करेपर्यंत चोरटे घटनास्थळाहून पसार झाले.
या प्रकरणी बलक यांच्या फिर्यादीवरुन सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The short-lived women's representative stretched up to 54 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.