श्रावणी सोमवारच्या पुर्वसंध्येला त्र्यंबकेश्वरला गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 07:52 PM2018-08-12T19:52:40+5:302018-08-12T19:53:56+5:30
त्र्यंबकेश्वर : श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट सज्ज झाले असून दर्शनासाठी पुर्व दरवाजाने प्रवेश देणे सुरु केले आहे. गर्दीच्या नियोजनाबाबत विश्वस्त दिलीप तुंगार प्रशांत गायधनी व संतोष तुंगार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य मुख्य कार्यकारी अधिकारी राजाभाऊ जोशी आदी प्रयत्नशील आहेत.
नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विश्वस्त मंडळाने बैठक घेऊन देवस्थानची बाजू सांगितली. या वेळी देणगी दर्शनाच्या रांगेतदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. भाविकांशी उर्मटपणाने वागु नका सौजन्याची वागणुक द्या. अशा सूचना कर्मचा-यांना सक्त सुचना दिल्या आहेत. भाविकांसाठी उभारण्यात आलेला मंडप सप्टेंबर महिन्यापर्यंत ठेवला जाणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली. दोन दिवसांपुर्वीच जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. व ग्रामीण जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे यांनी श्रावण महिना नियोजन आराखडा बैठक घेउन अधिका-यांना मार्गदर्शक सूचना केल्या होत्या.