श्री काल भैरवनाथ जोगेश्वरी यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 05:51 PM2019-04-15T17:51:11+5:302019-04-15T17:51:24+5:30
वडनेरभैरव - श्री काल भैरवनाथ जोगेश्वरी यात्रोत्सवास सालाबाद प्रमाणे यात्रोत्सव ( लग्न सोहळा ) नुकताच संपन्न झाला. गंगाजलाने अभिषेक करु न देव घटी बसवून यात्रेची सुरवात करण्यात आली.
वडनेरभैरव - श्री काल भैरवनाथ जोगेश्वरी यात्रोत्सवास सालाबाद प्रमाणे यात्रोत्सव ( लग्न सोहळा ) नुकताच संपन्न झाला.
गंगाजलाने अभिषेक करु न देव घटी बसवून यात्रेची सुरवात करण्यात आली.या यात्रोत्सवात दैनंदिनी मध्ये मंदिरा पुढे रोज गावातील लहान मुलांन पासुन वयोवृध्दा पर्यंत सर्वच जण नगाऱ्याच्या तालावर टिपºया खेळले. परिसरातील वाघे मंडळींनी रोज जागराण केले. रोज गावातील भाविक भक्तांनकडुन सामुदायिक महाआरती करण्यात आली. भक्तांनी नवस वाजत गाजत देवाला पोशाख ( वाघा) देउन आपला नवस फेडले.
मंगळवार दि. १६ रोजी संध्याकाळी सात वाजता पालखी ( छबीना ) सोहळ्यास पालखीमधे देवाचे टाक ठेऊन सुरवात होईल पालखीच्या पुढे वाजंत्री नगारा शिंग फुकणारा असे पारंपारिक वाद्य वाजवणारे वाद्य वाजवीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत राहील पालखी माळी गल्ली, सावतामाळी मंदिर ,कुंभारगल्ली ,सलादे बाबा दत्तमहाराज मंदिर, पिमको बँक ,मेनरोड ,ग्रामपालिका मार्गे मारु ती मंदिरापाशी येईल तेथे श्री कालभैरवनाथ महाराज व जोगेश्वरीमाता यांचा साखरपुड्याचा कार्यक्र म होईल नंतर पालखी पुढे मार्गस्थ होईल पालखी भगवा चौक साबरगल्ली सावतामाळी चौक मार्गे मंदिरापाशी येईल मंदिरात आरती होऊन पालखी ( छबिना ) सोहळ्याची सांगता होईल. बुधवार दि. १७ रोजी सकाळी ८.३०वा. जानवस घरी मांडव टाकण्याचा कार्यक्र म होईल