स्वीकृत नगरसेवकपदी श्रीकांत गायधनी,गंगापुत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:20 PM2018-03-14T22:20:42+5:302018-03-14T22:20:42+5:30

त्र्यंबकेश्वर : येथील नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अ‍ॅड. श्रीकांत प्रभाकर गायधनी व श्याम माधवराव गंगापुत्र यांची नियुक्ती नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी केली. बुधवारी बोलविलेल्या विशेष सभेत नगराध्यक्षांनी ही घोषणा केली. आज सर्व म्हणजे १६ नगरसेवक, उपनगराध्यक्ष असे १८ जण उपस्थित होते. आता यापुढे पालिकेत दोन स्वीकृत नगरसेवकांसह एकूण सदस्य संख्या २० झाली आहे.

Shrikant Gaidhani, Gangaputra, as an Approved Municipal Councilor | स्वीकृत नगरसेवकपदी श्रीकांत गायधनी,गंगापुत्र

स्वीकृत नगरसेवकपदी श्रीकांत गायधनी,गंगापुत्र

Next
ठळक मुद्देत्र्यंबक नगरपालिका : विशेष सभेत निवडआज फक्त नगराध्यक्षांनी औपचारिकरीत्या नियुक्तीचा आदेश सभागृहात वाचून दाखविला

त्र्यंबकेश्वर : येथील नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अ‍ॅड. श्रीकांत प्रभाकर गायधनी व श्याम माधवराव गंगापुत्र यांची नियुक्ती नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी केली. बुधवारी बोलविलेल्या विशेष सभेत नगराध्यक्षांनी ही घोषणा केली.
आज सर्व म्हणजे १६ नगरसेवक, उपनगराध्यक्ष असे १८ जण उपस्थित होते. आता यापुढे पालिकेत दोन स्वीकृत नगरसेवकांसह एकूण सदस्य संख्या २० झाली आहे. या नियुक्तीचे भाजपा नेते भावेश शिखरे, माधवराव भुजंग, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, माजी गटनेते रवींद्र सोनवणे, नगरसेवक अनिता बागुल, सागर उजे, आरपीआय तालुकाध्यक्ष शांताराम बागुल, कैलास नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल फडके आदींनी स्वीकृत नगरसेवक निवडीवर मनोगत व्यक्त केले. श्याम गंगापुत्र हे शहर भाजपाचे अध्यक्ष असून, त्यांनी आपल्या कार्यकाळात पक्षाचे अनेक उपक्रम राबवून पक्षकार्य वाढविले.
पक्ष काम करीत असताना पालिका निवडणूक लागली. तर जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष असलेले अ‍ॅड. श्रीकांत गायधनी हे व्यवसायाने वकील असून, त्यांना पालिकेच्या दैनंदिन कामाचा चांगला अनुभव आहे. गायधनी हे गावातील याज्ञवल्क्य सभागृह, लोकमान्य स्मारक मोफत वाचनालय, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. यावेळी मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे, कार्यालयीन अधीक्षक अरुण गरुड, संजय मिसर आदी उपस्थित होते. केवळ औपचारिकता... पालिकेची निवडणूक झाल्यानंतर नागरिकांना प्रतीक्षा होती ती स्वीकृत नगरसेवक निवडीची. पण सन १९६५ नगरपालिका अधिनियमात नवीन तरतूद करून स्वीकृत नगरसेवक निवड ऐवजी नगराध्यक्षांनी नियुक्ती करून करावयाची आहे. त्याप्रमाणे नगराध्यक्षांनी नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेत भाजपाला निर्विवाद एकतर्फी यश मिळाल्याने पालिकेची सूत्रे आता पक्षाच्या हाती आहेत. त्यामुळेच पक्षाकडूनच स्वीकृत नगरसेवकांची नावे बंद लिफाफ्यात आली. अर्थात ती सर्वांनाच ठाऊक होती. आज फक्त नगराध्यक्षांनी औपचारिकरीत्या नियुक्तीचा आदेश सभागृहात वाचून दाखविला.

Web Title: Shrikant Gaidhani, Gangaputra, as an Approved Municipal Councilor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.