अभोणा : कळवण तालुक्यासह शेजारील गुजराथ राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या सुळे येथील श्रीक्षेत्र सिध्देश्वर महादेव मंदिराचा एक दिवसीय तसेच होळी निमित्त तीन दिवस चालणारा यात्रोत्सव यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी रद्द करण्यात आला आहे.कळवण तालुक्याच्या दुर्गम आदिवासी पट्टयातील पुनंद खोऱ्यात पुनंद नदिकाठी भगवान श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन असे अतिप्राचीन शिवमंदिर आहे. येथे शेकडो वर्षापासून भगवान शंकराच्या उपासनेतील महाशिवरात्री उत्सवानिमित्त येणारे हजारो भाविक मंदिरालगतच्या शिवकुंडात सचैल स्नान करून भगवान महादेवाची आराधना करतात. या एकदिवसीय यात्रे नंतर याच स्थळी होळी पौर्णीमे पर्यंत तीन दिवस मोठी यात्रा भरते.यात्रेत कोटयावधी रूपयांची उलाढाल तर होतेच मात्र,अनेक वर्षापासून या पंचक्रोशितील आदिवासी बांधवांमध्ये या यात्रेत सग्यासोयऱ्यांना आमंत्रित करत उपवर वधु-वरांच्या पसंतीने सोयरिक जमविण्याची एक अनोखी प्रथा यात्रेचे खास वैशिष्ट आहे.मात्र असे असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा दिनांक ११मार्च रोजीचा शिवरात्रोत्सव तसेच दिनांक २८मार्चला होळीनिमित भरणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासन,पोलीस आणि देवस्थान यांनी घेतला आहे.मात्र यात्रोत्सव रद्द झाल्याने उलाढाल ठप्प होणार आहे.यात्रा ही रद्दश्रीक्षेत्र देवळीकराड, श्रीक्षेत्र गुंदेश्वर, श्रीक्षेत्र चणकेश्वर, श्रीक्षेत्र देसगांव यासह तालुक्यात इतरही क्षेत्री महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत.
श्रीक्षेत्र सिध्देश्वरचा यात्रोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 3:40 PM
अभोणा : कळवण तालुक्यासह शेजारील गुजराथ राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या सुळे येथील श्रीक्षेत्र सिध्देश्वर महादेव मंदिराचा एक दिवसीय तसेच होळी निमित्त तीन दिवस चालणारा यात्रोत्सव यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी रद्द करण्यात आला आहे.
ठळक मुद्देशिवकुंडात सचैल स्नान करून भगवान महादेवाची आराधना करतात.