गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:00 AM2018-10-23T01:00:17+5:302018-10-23T01:00:35+5:30

गिरणारे येथील टमाटा बाजारात व्यापाऱ्यांकडून परस्पर कुणीही पैशांची वसुली करू नये, असा ठराव विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. रामचंद्र देवस्थान ट्रस्टने या वसुलीबाबत दिलेल्या लिलावास ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्यात आला. याबाबत सर्वसंमतीने ठराव संमत झाला या निर्णयामुळे लाखो रुपयांच्या बेकायदेशीर वसुलीला चाप बसणार आहे.

 Shrinking the market in the fall market | गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप

गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप

Next

गंगापूर : गिरणारे येथील टमाटा बाजारात व्यापाऱ्यांकडून परस्पर कुणीही पैशांची वसुली करू नये, असा ठराव विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. रामचंद्र देवस्थान ट्रस्टने या वसुलीबाबत दिलेल्या लिलावास ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्यात आला. याबाबत सर्वसंमतीने ठराव संमत झाला या निर्णयामुळे लाखो रुपयांच्या बेकायदेशीर वसुलीला चाप बसणार आहे.  नाशिक तालुक्यातील गिरणारे बाजारपेठेत टमाटा खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या भागातून व्यापारी येत असतात आणि स्थानिक शेतकºयांचा टमाटा खरेदी करून दुसºया राज्यात पाठवतात त्यामुळे याठिकाणी स्थानिक शेतकºयांना जागेवरच चांगला भाव मिळत असल्याने दरवर्षी शेतकरी या ठिकाणी व्यापाºयांची वाट बघतात. मात्र गावातील काही समाजकंटक व गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून व्यापाºयांना धमकावले जाऊन त्यांच्याकडून ग्रामपंचायतीच्या कराव्यतिरिक्त जास्त पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार ग्रामपंचायतीला प्राप्त झाली होती, त्यामुळे गिरणारे ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करून टमाटा बाजारात व्यापाºयांकडून परस्पर कोणीही पैशांची वसुली करू नये, असा ठराव बुधवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. गिरणारे बाजारात हंगामात सरासरी एक लाख क्रेट टमाट्याची आवक होते. अनेक व्यक्ती व संस्था व्यापाºयांकडून परस्पर पैशांची वसुली करतात, यामुळे टमाट्याच्या बाजारावर विपरित परिणाम होतो. गिरणारे टमाटा मार्केट हंगामास प्रारंभ झाला असून, या पार्श्वभूमीवर गिरणारेची ग्रामसभा बोलावण्यात आली होती. यावेळी ग्रामपंचायती व्यतिरिक्त अन्य कुणीही बाजार वसुली करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. रामचंद्र देवस्थान ट्रस्टच्या संचालकांनी विश्वासात न घेता परस्पर बाजाराचा लिलाव जाहीर केला आहे. तो बेकायदेशीर असून, त्याबाबत दाद मागण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनीही त्यास विरोध केला. यावेळी निवृत्ती घुले, पुंडलिकराव थेटे, भिका भाऊ थेटे, नितीन गायकर, महेंद्र थेटे, हरिभाऊ गायकर, रोहन थेटे आदी उपस्थित होते.
गिरणारे टमाटा बाजार शेतकरी व व्यापाºयांना रस्ते, वीज, पाणी या सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून नियोजन करण्यात येणार आहे. हंगामातील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी येण्या-जाण्याचे मार्ग निश्चित करण्यात येणार आहे. बाजारातील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.  - अलका दिवे, सरपंच

Web Title:  Shrinking the market in the fall market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.