ओझर परिसरात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 11:34 PM2020-03-22T23:34:33+5:302020-03-22T23:35:23+5:30

ओझर : रविवारी देशभर पाळला गेलेला जनता कर्फ्यू ओझरकर नागरिकांनी शंभर टक्के यशस्वी करून दाखविला.

Shuksakat in the area of Ozar | ओझर परिसरात शुकशुकाट

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असललेला शुकशुकाट

Next
ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : जनता कर्फ्यू शंभर टक्के यशस्वी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
ओझर : रविवारी देशभर पाळला गेलेला जनता कर्फ्यू ओझरकर नागरिकांनी शंभर टक्के यशस्वी करून दाखविला.
ओझरच्या वर्दळीच्या केंद्रस्थानी असलेल्या मेनरोड, ग्रामपंचायत कार्यालयांच्या रस्त्यांचा भार नाहीसा झाला तर गावातील तांबट लेन, शिवाजी रोड, तानाजी चौक, पोलीस चौकीसमोरील भाग, राजवाडा, टाउनशिप, मेनगेट, बाजारतळ, शिवाजीनगर, निवृत्तिनाथनगर, चांदणी चौक, मर्चंट बँक चौक, जयमल्हार चौक व गावातील इतर उपनगरांमधील हजारो नागरिक रविवारी रस्त्यावर आलेच नाही तर वर्दळीच्या केंद्रस्थानी असलेल्या गावातील सर्वच रस्त्यांवर न भूतो असा शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकल दुकाने व काही त्यात समाविष्ट असलेली दुकानेच उघडी राहिली तर अनेक किराणा दुकानचालकांनी घरीच राहण्याचा निर्णय घेतला होता. गावातील अनेक कुटुंबातील सदस्यांनी या महाभयानक विळख्यातून जगाची लवकर सुटका होऊ दे असे साकडे देवाला घातले. कुठे हनुमान चालिसा, गीता श्लोक, सुंदरकांडचे पाठ करण्यात आले, तर मुस्लीम समाजाने नमाज अदा करून सर्व काही सुरळीत होण्याचे साकडे घातले. एरवी गावातील दिवसभर दर्शनाची वर्दळ सुरू असलेल्या मारुती वेस येथील हनुमान मंदिरात शुकशुकाट दिसला. एकूणच जनता कर्फ्यू जनतेने शंभर टक्के यशस्वी करून दाखविला आहे.महामार्ग दिसला पहिल्यांदाच सुनासुनामुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३ हा सर्वच वाहनांच्या वर्दळीचा केंद्रबिंदू समजला जातो, परंतु रविवारी सदर महामार्गावर दर पाच मिनिटांनी एक वाहन दिसत होते. सकाळच्यावेळी अत्यावश्यक सेवेतील पेट्रोल, डिझेलचे टँकर वगळता खासगी वाहनांनी कोरोनामुळे महामार्गावर येण्यास असमर्थता दर्शविली. विशेष म्हणजे सदर महामार्गावर एरवी पाच मिनिटात अंदाजे दोन-अडीचशे वाहने ये-जा करीत असताना रविवारी अनेकदा तर पाच मिनिटात एकही वाहन दिसले नाही.

Web Title: Shuksakat in the area of Ozar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.