वणी : कोजागरी उत्सव सोहळ्यानंतर सप्तशृंग गडावर शुकशुकाट झाला असून भाविक परतीच्या मार्गावर आहेत. कोजागरी पौर्णीमेला गडावर अभुतपुर्व अशी गर्दी होती. सकाळपासुनच भाविकांच्या बाऱ्या लागल्या होत्या. पहिल्या पायरीपासुन सुमारे शंभर मिटर अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केन्द्रापर्यंत बाºया लागल्या होत्या. २४ तास बाºया लागल्यामुळे त्या अंतरापासुन पहिल्या पायरीपर्यंत असणारे विविध व्यावसायिक त्यात पुजेचे साहीत्य साड्यांची दुकाने प्रसादाची दुकाने व इतर व्यावसायिक यांच्या दुकानापुढे भाविकांची अलोट गर्दी झाल्याने त्याचा व्यवसायावर परिणाम झाला. जुने बस स्ट्ँड शिवालय परिसर पायऱ्यांपासून लांब अंतरावर असलेल्या व्यावसायिकांचे व्यवसाय तेजीत होते. काही दुकानदारांचा तर मालही संपला होता .दरम्यान सर्वात जास्त फायदा झाला तो हॉटेल व्यावसायिकांना. गडावर न्यासाच्या भक्तनिवासाच्या अंदाजे ५०० रु म असुन त्या अगोदरच बुक झाल्या होत्या. गडावर सुमारे १५० च्या जवळपास निवास व्यवस्था करणारे खाजगी लॉजींग आहे. भक्तनिवासात जागा नसल्याने स्वाभाविकपणे खाजगी लॉजींगचा आसरा भाविकांना घ्यावा लागला. त्या सर्व निवासव्यवस्था हाऊस फुल झाल्या होत्या. त्यामुळे याचा फायदा या व्यावसायिकांना झाला कारण अनेक व्यावसायिक जागा बांधाकाम यात गुंतवणुक करतात. ही गुंतवणुक मोठी असते त्या तुलनेत अपेक्षित परतावा मिळावा असे गणित त्यापाठीमागे असते. नवरात्र कालावधीत हा सुद्धा व्यवसय ग्राहकांअभावी अडचणीत सापडला होता मात्र कोजागरी पौर्णिमेने हात दिल्याने या व्यावसायिकांना दिलासा मिळाला. दरम्यान उत्सव सांगतेनंतर परतीच्या प्रवासाला लागलेले भाविक कावडधारक व तृतीयपंथी यांनी गड सोडल्यानंतर गडावर शुकशुकाट झाला आहे. उत्सव यशस्वीपणे साजरा करण्यासाठी सप्तशृंगगड ग्रामपंचायत न्यास कार्यकारी मंडळ सामाजीक कार्यकर्ते गडावरील व्यावसायिक व ग्रामस्थ प्रशासकीय व्यवस्था यांचे महत्वपुर्ण योगदान झाल्याची माहिती उपसरपंच राजेश गवळी, माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांनी दिली.
सप्तशृंगगडावर शुकशुकाट, भाविक परतीच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 2:15 PM