सायखेड्यात कांदा भिजलापावसाने धावपळ : ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 10:35 PM2017-12-06T22:35:27+5:302017-12-06T22:39:15+5:30
सायखेडा : ओखी वादळामुळे आलेल्या पावसाने जिल्ह्यातील काही भागात कांदा भिजल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. रिमझिम पाऊस आणि थंड हवेमुळे कांदा खराब झाला आहे. कांद्याचे वरील टरफल खराब झाले आहे. सायखेडा परिसरातील द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकºयांना याचा मोठा फटका बसला आहे. दिवसभर रिमझिम पाऊस, गारवा आणि ढगाळ वातावरणामुळे पूर्ण अवस्थेतील द्राक्षमण्यांना तडे जाऊ लागले आहेत. भुरी रोगाचा वाढता प्रादुर्भाव शेतकºयांची डोकेदुखी ठरत आहे तर उशिरा द्राक्ष हंगाम घेणाºया शेतकºयांचा बाग फुलोरा स्टेजमध्ये असल्याने गळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सायखेडा : ओखी वादळामुळे आलेल्या पावसाने जिल्ह्यातील काही भागात कांदा भिजल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
रिमझिम पाऊस आणि थंड हवेमुळे कांदा खराब झाला आहे. कांद्याचे वरील टरफल खराब झाले आहे. सायखेडा परिसरातील द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकºयांना याचा मोठा फटका बसला आहे. दिवसभर रिमझिम पाऊस, गारवा आणि ढगाळ वातावरणामुळे पूर्ण अवस्थेतील द्राक्षमण्यांना तडे जाऊ लागले आहेत. भुरी रोगाचा वाढता प्रादुर्भाव शेतकºयांची डोकेदुखी ठरत आहे तर उशिरा द्राक्ष हंगाम घेणाºया शेतकºयांचा बाग फुलोरा स्टेजमध्ये असल्याने गळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
भेंडाळी, महाजनपूर, औरंगपूर परिसरात लाल कांदा काढणीला वेग आला आहे. कमी पाणी, मुरमाड जमीन यामुळे या भागात लाल कांदा लागवड जुलै, आॅगस्ट महिन्यात केली जात असते. त्या भागातील कांदा काढणीला वेग आला असताना अस्मानी संकटामुळे शेतात काढून पडलेला कांदा आणि काढण्यासाठी आलेल्या कांद्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी लागल्यामुळे कांदा खराब झाला आहे. शेतातच कांदा सडण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सलग तीन वर्षे बेभाव विक्र ी केलेल्या कांद्याला यंदा दोन पैसे मिळतील अशी परिस्थिती असताना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. भेंडाळी येथील शेतकरी संदीप सातपुते यांचा एक एकर कांदे तीन दिवसांपासून शेतात काढून पडले आहेत. लाल कांदा काढणीचा हंगाम सुरू होऊन बाजारात दाखल झाला होता.आर्थिक संकटडांगसौंदाणे : परिसरात मंगळवारी पहाटे पावसाला सुरुवात झाली. दिवसभर ढगाळ वातावरणानंतर व पाऊस सुरू होता. परिणामी द्राक्ष उत्पादक व नव्याने उन्हाळ कांदा लागवड केलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. या वातावरणाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीस आलेल्या मालाचे मोठे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गारव्यामुळे तयार द्राक्षबागेचा फटका बसून मोठे नुकसान होणार असून, नव्याने लागवड झालेला उन्हाळ कांदाही बुरशीजन्य रोगांना बळी पडणार आहे, तर खरिपाचा कापणी करून पडलेला मका व चारा या पावसामुळे खराब होणार आहे. डांगसौंदाणे आठवडे बाजार असल्याने बाहेरगावहून
आलेले व्यापारी विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले, तर पावसामुळे बाजारात कोणीही हजेरी न लावल्यामुळे गजबजणारे बाजार आवार सुनसान दिसत होते. भाजीपाला विक्रीसाठी आलेले व्यापारी व शेतकºयांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. खामखेडा परिसरात
शेतकरी हवालदिलखामखेडा : ओखी वादळामुळे झालेल्या पावसाचा तडाखा जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकºयांना बसला आहे.
देवळा तालुक्यातील खामखेडा, सावकी, पिळकोस, भादवन, विसापूर आदी भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याबरोबर लाल कांद्याचे
उत्पादन घेतले जाते. कांद्याकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. चालू वर्षी उशिरा पावसामुळे लाल
कांद्याची लागवड उशिरा झाली
होती.
गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाळी कांद्याला चांगल्यापैकी भाव मिळत होता. त्यामुळे लाल कांद्याला पुढे चांगला भाव मिळेल या आशेने
लाल कांद्याचे पीक चांगल्यापैकी आले होते.उत्पादनात घटमंगळवारी सकाळी अचानक तुरळक पावसाला सुरुवात झाली. परंतु दुपारी जोरात पाऊस सुरू झाल्याने शेतात काढून मार्केटसाठी तयार केलेला आणि नुकताच काढलेला कांदा पावसात भिजला. या पावसामुळे भिजून गेलेला कांदा खराब होऊन उत्पादनात घट होणार आहे तर जो जमिनीत आहे तो या बेमोसमी पावसामुळे जमिनीतच खराब होतो की काय याची चिंता आता शेतकºयाला सतावत आहे.