नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यातील दहा दिवसांसाठी स्थापना केलेल्या गणरायाला कोरोनाच्या पाशर््वभूमीवर सोशल डिस्टिन्संगची अंमलबजावणी करत विनावाद्य अत्यंत साधेपणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धार्मिक विधी, वाद्य यावर बंदि असल्यामुळे येथील गणरायाला मिरवणूक न काढता तसेच कुठल्याही प्रकारचे वाद्य न वाजवता अतिशय साधेपणाने गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. याकाळात काही कारखान्यांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्र म तसेच स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात येते. दहा दिवस चालणार्या या गणेशोत्सवामध्ये कामगार स्वत: ला गणरायाच्या भक्तीमध्ये वाहुन घेतात. येथील अनेक कारखान्यांमध्ये महापूजेचे आयोजन करण्यात येते. येथे असलेल्या कारखान्यांमध्ये देखील सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. यानंतर सुसज्ज अशा हाराफुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून गणरायाच्या मिरवणूकीला सुरूवात करण्यात येते .ढोलताशांच्या ठेक्यावर ठेका धरत भाविक नृत्य करत मिरवणुकीमध्ये सामील होत असतात. यानंतर शेवटी मुकणे धरण येथे गणरायाची सामुहिक आरती झाल्यानंतर गणरायाला ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशी गर्जना करु न भावपूर्ण निरोप दिला जातो, परंतू यावर्षी हे सर्व कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्व बंद करण्यात आल्यामुळे भाविकांना चुकल्यासारखे वाटत होते.
गोंदे दुमाला येथे साधेपणाने विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 4:57 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यातील दहा दिवसांसाठी स्थापना केलेल्या गणरायाला कोरोनाच्या पाशर््वभूमीवर सोशल डिस्टिन्संगची अंमलबजावणी करत विनावाद्य अत्यंत साधेपणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला.
ठळक मुद्देकुठल्याही प्रकारचे वाद्य न वाजवता अतिशय साधेपणाने गणरायाला भावपूर्ण निरोप