सिन्नरला नगरसेवकपदाच्या जागा २८, उमेदवार मात्र ९५

By admin | Published: November 11, 2016 11:09 PM2016-11-11T23:09:23+5:302016-11-11T23:21:48+5:30

नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत : शेवटच्या दिवशी ११ जणांची माघार; अटीतटीच्या लढती होणार

Sinnar gets 28 seats in municipality, candidate only 9 5 | सिन्नरला नगरसेवकपदाच्या जागा २८, उमेदवार मात्र ९५

सिन्नरला नगरसेवकपदाच्या जागा २८, उमेदवार मात्र ९५

Next

सिन्नर : नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ११ जणांनी माघार घेतली. नगरसेवकपदासाठी एकूण १४ जणांनी माघार घेतली असून, २८ जागांसाठी ९५ उमेदवार, तर थेट नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी पाच असे एकूण १०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस, मनसे व एक अपक्ष असे पाच उमेदवार रिंगणात आहेत, तर नगरसेवकपदाच्या २८ जागांसाठी शिवसेना २८, भाजपा २८, कॉँग्रेस १४, राष्ट्रवादी ९, मनसे ६, बसप १ व अपक्ष ९ असे ९५ उमेदवार रिंगणात आहेत.
सिन्नर नगरपालिकेच्या २८ जागांसाठी येत्या २७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत होती. नगरसेवकपदाच्या २८ जागांसाठी १०९ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील एकूण १४ जणांनी माघार घेतली.
शुक्रवारी शेवटच्या दिवशी सोनाली सुहास गोजरे (१ अ), किरण राजाराम गोजरे (११ ब), दर्शन सुरेश कासट (६ ब), गणेश केशव तटाणे ( १ ब), विकास कृष्णा जाधव (५ ब) निशा संजय बोडके (८ ब), अनिल अशोक सरवार (१० ब), वैशाली अनिल वराडे (८ ब), गणेश फुलचंद रणमाळे (६ ब), परवीन जमीर सय्यद (७ ब) या अपक्ष उमेदवारांसह राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजेंद्र दादा बलक (१४ ब) यांनी माघार घेतली. यापूर्वी अपक्ष राजेंद्र घोरपडे, कॉँग्रेसच्या उमेदवार सविता सुनील वाळेकर व पांडुरंग रामभाऊ वारुंगसे यांनी माघार घेतली आहे.
माघारीनंतर नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. माघारीनंतर निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेले उमेदवार पुढलीप्रमाणे- नगराध्यक्षपदासाठी अशोक रंगनाथ मोरे (भाजपा), सौ. लता मनोहर हिले (कॉँग्रेस), किरण विश्वनाथ डगळे (शिवसेना), राजेंद्र सुकदेव बोरसे (मनसे) व वसंतराव खंडेराव नाईक (अपक्ष) असे पाच उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत.
नगरसेवकपदासाठी रिंगणात असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे - १ अ (सर्वसाधारण महिला) - नलीनी शंकर गाडे (शिवसेना), संगीता शिवाजी बुटे (भाजपा). प्रभाग १ ब (सर्वसाधारण) - प्रमोद रामराव लोहार (राष्ट्रवादी कॉँग्रेस), विठ्ठल अशोक उगले (भाजपा), बाळू पांडुरंग उगले (शिवसेना). प्रभाग २ अ (सर्वसाधारण महिला) - शीतल सुनील कानडी (भाजपा), सारिका नितीन कराळे (शिवसेना), मेघा विलास दराडे (कॉँग्रेस). प्रभाग २ ब (सर्वसाधारण) - एकनाथ म्हाळू दिघे (मनसे), संतोष एकनाथ शिंदे (भाजपा), नामकर्ण यशवंत आवारे (शिवसेना), हरिभाऊ बाळाजी तांबे (कॉँग्रेस).
प्रभाग ३ अ (अनुसूचित जाती) - अजय शंकर तुपे (भाजपा), श्रीकांत आनंदा जाधव (शिवसेना), अंबादास यशवंत भालेराव (राष्ट्रवादी कॉँग्रेस), सचिन चंद्रकांत गायकवाड (बसप), मनोहर भिकाजी दोडके (मनसे). प्रभाग ३ ब (सर्वसाधारण महिला) - प्रतिभा योगेश नरोटे (शिवसेना), उज्वला त्र्यंबक खालकर (भाजपा), समता दीपककुमार श्रीमाली (मनसे). प्रभाग ४ अ (ओबीसी) - मल्लू मारुती पाबळे (भाजपा), संदीप बाबूराव जाधव (कॉँग्रेस), लोकेश तात्या धनगर (शिवसेना). प्रभाग ४ ब (सर्वसाधारण महिला) - अलका वसंत बोडके (भाजपा), अलका अशोक जाधव (शिवसेना), बेबी अंकुश ससाणे (अपक्ष), शोभा ज्ञानेश्वर लोखंडे (मनसे), अनुसया फुलचंद रणमाळे (कॉँग्रेस).
प्रभाग ५ अ (ओबीसी महिला) - सुजाता अमोल भगत (शिवसेना), निर्मला राकेश कमानकर (भाजपा), सुजाता सचिन नवसे (अपक्ष). प्रभाग ५ ब (सर्वसाधारण) - हर्षद प्रभाकर देशमुख (अपक्ष), सचिन जगदीश लहामगे (राष्ट्रवादी), संजय गंगाधर चोथवे (भाजपा), प्रमोद झुंबरलाल चोथवे (शिवसेना). प्रभाग ६ अ (अनुसूचित जमाती महिला) - चैताली रामनाथ मोरे (भाजपा), विजया शरद बर्डे (शिवसेना), अनिता उदय नाईक (कॉँग्रेस). प्रभाग ६ ब (सर्वसाधारण) - युगेंद्र रमेश क्षत्रिय (भाजपा), हेमंत विठ्ठल वाजे (शिवसेना), कैलास विश्वनाथ दातीर (मनसे), योगेश शांताराम क्षत्रिय (अपक्ष), मेहमूद इब्राहीम दारुवाले (कॉँग्रेस). प्रभाग ७ अ (ओबीसी) - नामदेव प्रताप लोंढे (भाजपा), योगेश दादा लोंढे (शिवसेना), राजेंद्र विठ्ठल उगले (राष्ट्रवादी कॉँग्रेस). प्रभाग ७ ब (सर्वसाधारण महिला) - रजिया इलियास खतीब (शिवसेना), राधिका रोशन नवसे (भाजपा), सोनाली प्रमोद पाटील (राष्ट्रवादी), प्रणाली भाऊशेठ भाटजिरे (अपक्ष).
प्रभाग ८ अ (ओबीसी) - शैलेंद्र बन्सीलाल नाईक (शिवसेना), किरण जगन्नाथ मुत्रक (भाजपा), ईश्वर दत्तात्रय लोणारे (कॉँग्रेस). प्रभाग ८ ब (सर्वसाधारण महिला) - सुजाता संतोष तेलंग (शिवसेना), अर्चना सुशिल जाजू (भाजपा). प्रभाग ९ अ (ओबीसी) - पुंजा रामचंद्र उगले (शिवसेना), कल्पना दत्ता रेवगडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस), सुहास किसन गोजरे (भाजपा). प्रभाग ९ ब (सर्वसाधारण महिला) - रत्नामाला दत्तात्रय साळवे (कॉँग्रेस), वासंती वैभव देशमुख (भाजपा), संध्या रवींद्र तटाणे (शिवसेना). प्रभाग १० अ (ओबीसी महिला) - निरुपमा शैलेश शिंदे (शिवसेना), पुनम राम लोणारे (कॉँग्रेस), वैशाली अनिल वराडे (भाजपा), प्रभाग १० ब (सर्वसाधारण) - गोविंद विठ्ठल लोखंडे (शिवसेना), दिलीप कचेश्वर भाबड (कॉँग्रेस), बापू पांडुरंग गोजरे (भाजपा). प्रभाग ११ अ (ओबीसी महिला) - ज्योती संजय वामने (शिवसेना), भारती लक्ष्मण बर्गे (भाजपा). प्रभाग ११ ब (सर्वसाधारण) - सोमनाथ पंढरीनाथ पावसे (शिवसेना), अनिल गंगाधर कर्पे (भाजपा), अनिल अशोक सरवार (अपक्ष), त्र्यंबक मारुती सोनवणे (कॉँग्रेस), वैभव भगवान ठाणेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस), मारुती भास्कर कणकुटे (अपक्ष), मंगल दिलीप आरोटे (मनसे).
प्रभाग १२ अ (ओबीसी) - योगिता कैलास झगडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस), ज्योती प्रवीण झगडे (भाजप), गीता हरिभाऊ वरंदळ (शिवसेना). प्रभाग १२ ब (सर्वसाधारण) - पंकज अशोक मोरे (शिवसेना), संदीप लक्ष्मण मुत्रक (राष्ट्रवादी कॉँग्रेस), रोहन त्र्यंबक खालकर (भाजपा). प्रभाग १३ अ (अनुसूचित जमाती) - विलास गोपीनाथ जाधव (भाजप), ज्ञानेश्वर गणपत पवार (कॉँग्रेस), रुपेश रखमा मुठे
(शिवसेना).
प्रभाग १३ ब (सर्वसाधारण महिला)- लता निवृत्ती मुंढे (कॉँग्रेस), प्रीती महेंद्र वायचळे (भाजप), सुनीता रामनाथ वरंदळ (शिवसेना), रुपाली शरद काळे (अपक्ष). प्रभाग १४ अ (अनुसूचित जाती महिला) - मालती प्रवीण भोळे (भाजप), कुसूम श्रीधर जाधव (शिवसेना), सुरेखा शरद साळवे (कॉँग्रेस). प्रभाग १४ ब (सर्वसाधारण)- चित्रा नामदेव लोंढे (भाजप), सागर मुरलीधर भाटजिरे (शिवसेना), देवीदास मुरलीधर गोळेसर (अपक्ष). (वार्ताहर)

Web Title: Sinnar gets 28 seats in municipality, candidate only 9 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.