सिन्नरला पोलीस-आरोग्य विभागाचा ‘अ‍ॅक्शन मोड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 08:37 PM2020-03-28T20:37:42+5:302020-03-28T20:38:06+5:30

सिन्नर : वडांगळी येथील क्वॉरण्टाइन असलेले काही ग्रामस्थ सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याने या आजाराचे गांभीर्य लक्षात आलेल्या ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणेने ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये येत होम क्वॉरण्टाइन असलेल्या मात्र सार्वजनिक ठिकाणी फिरत असलेल्या व्यक्तींना कडक कारवाईचा इशारा दिला.

Sinnar gets police-health department 'action mode' | सिन्नरला पोलीस-आरोग्य विभागाचा ‘अ‍ॅक्शन मोड’

सिन्नरला पोलीस-आरोग्य विभागाचा ‘अ‍ॅक्शन मोड’

Next
ठळक मुद्देवडांगळी । तपासणी करून होम क्वॉरण्टाइनना दिला कारवाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : वडांगळी येथील क्वॉरण्टाइन असलेले काही ग्रामस्थ सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याने या आजाराचे गांभीर्य लक्षात आलेल्या ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणेने ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये येत होम क्वॉरण्टाइन असलेल्या मात्र सार्वजनिक ठिकाणी फिरत असलेल्या व्यक्तींना कडक कारवाईचा इशारा दिला.
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या गर्दीला आळा घालण्यासाठी पोलीस कुमक वाढविण्यात आली. पोलिसांची वाढलेली संख्या पाहून अनेकांनी तत्काळ घराकडे पोबारा केला. दरम्यान, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनीही ग्रामविकास अधिकारी सोळंकी यांना वडांगळीतील गर्दी हटवून नागरिकांना घरात थांबविण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना केल्या. बाजारपेठेत गर्दी होणार नाही अशा पद्धतीने नियोजन करण्याचे आदेश दिले. ग्रामपंचायतनेही बसस्थानक परिसरात दुकाने थाटणाऱ्या भाजी विक्रेत्यांना बाजारात दुकाने थाटायला लावली. त्यामुळे गर्दी नियंत्रणात आली. अत्यावश्यक सेवा देणारे किराणा, मेडिकल, शेतीविषयक औषधे व खतांची दुकाने, दवाखाने, बँक, बाजार आदी ठिकाणीही एक मीटरच्या अंतरावर ग्राहकांना उभे राहण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने चौकोन आखून दिले आहेत.आशा सेविकांचा असेल वॉच
होम क्वॉरटाइन असलेल्यांना काही लक्षणे आहेत का? त्याबाबत विचारणा करण्यात आली. वेगळ्या खोलीत राहण्याच्या सूचना दिल्या. ३५ जणांच्या भेटी घेण्यात आल्या. यापुढे आशा सेविकांना सर्व्हे करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे होम क्वॉरण्टाइनवर यापुढे आशा सेविकांचा वॉच असेल, अशी माहिती देवपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल विधाते यांनी दिली. आरोग्य विभागाने दखल घेऊन होम क्वॉरण्टाइनचा सल्ला देण्यात आलेल्या नागरिकांची भेट घेतली. त्यांची यापूर्वीच आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. देवपूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल विधाते, डॉ. सायली गावडे यांच्यासह आरोग्यसेवक अशोक सानप, आरोग्यसेविका खालकर यांनी संबंधिताना आरोग्याबाबत काळजी घेण्याच्या सूचना केल्या.

Web Title: Sinnar gets police-health department 'action mode'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.