सिन्नरला २१ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:26 AM2020-12-03T04:26:10+5:302020-12-03T04:26:10+5:30
------------------------ सरस्वती नदीचे प्रदूषण रोखा सिन्नर : शहरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीत होणारे प्रदूषण रोखण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सदर ...
------------------------
सरस्वती नदीचे प्रदूषण रोखा
सिन्नर : शहरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीत होणारे प्रदूषण रोखण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सदर नदी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहते. या नदीत मोठ्या प्रमाणात स्वच्छता व सुशोभिकरण अभियान राबविण्यात आले होते. मात्र मध्यवर्ती भागातून नदी वाहत असल्याने प्रदूषण वाढत आहे.
------------------
२५ सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार
सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. २५ सप्टेंबर २०२० या तारखेची मतदार यादी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.
--------------------
राजकीय हेतूने मुख्याधिकाऱ्यांवर आरोप
सिन्नर : नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांच्यावर केवळ दबाबतंत्रासाठी आणि राजकीय हेतूने आरोप केले जात असल्याचे सत्ताधारी शिवसेना महिला नगरसेवकांनी प्रसिद्धीपत्राद्वारे म्हटले आहे. एकीकडे मुख्याधिकाऱ्यांकडून कामे करून घेतली जातात व दुसऱ्या बाजूला त्यांचे मनोबल कमी करण्यासाठी त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप केले जात असल्याने हे राजकीय षडयंत्र असल्याचे शिवसेनेच्या महिला नगरसेविकांनी म्हटले आहे.
------------------
हॉटेलचालकांना दिलासा
सिन्नर : सिन्नर-शिर्डी व नाशिक-पुणे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असून, हॉटेलचालकांना पुन्हा नव्याने व्यवसाय मिळू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गेली आठ महिने कोरोना महामारीमुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी नव्हती. त्यानंतर वाहने सुरू झाली तरी हॉटेलवर थांबून कोणी जेवण करीत नव्हते. मात्र दिवाळीपासून हॉटेलचालकांना काही प्रमाणात व्यवसाय होऊ लागल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.