सिन्नरला २५ धोकादायक घरांना नोटीसा -
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:17+5:302021-06-19T04:10:17+5:30
------------------------- ३०० नदीकाठच्या घरांनाही सूचना सिन्नर शहरातून सरस्वती नदी वाहते. या नदीपात्रालगत अनेकांनी घरे बांधली आहेत. यातील अनेक घरे ...
-------------------------
३०० नदीकाठच्या घरांनाही सूचना
सिन्नर शहरातून सरस्वती नदी वाहते. या नदीपात्रालगत अनेकांनी घरे बांधली आहेत. यातील अनेक घरे पडकी किंवा धोकादायक नाहीत. मात्र, नदीपात्रालगत असल्याने त्यांना नदीच्या पाण्यापासून धोका आहे. अशा ३०० नदीकाठच्या घरांनाही सूचना करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिली.
----------------------
पेठ : दहा घरमालकांना नोटीस
पेठ : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असताना मान्सूनपूर्व खबरदारीचा व प्रतिबंधात्मक आपत्ती उपाययोजनेंतर्गत पेठ नगरपंचायत क्षेत्रातील जीर्ण झालेली व धोकादायक स्थितीत असलेली घरे दुरुस्ती किंवा काढून घेण्याबाबत घरमालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मुख्याधिकारी यांच्या स्वाक्षरीने शहरातील दहा घरमालकांना नोटीस बजावत धोकेदायक घरे दुरुस्ती करून घ्यावी किंवा खाली करावीत असा आदेश बजावण्यात आला आहे.