सिन्नर पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरटा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:22 AM2018-03-22T01:22:07+5:302018-03-22T01:22:07+5:30
नाशिक-पुणे महामार्गावर जबरी लूटमार करणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. अन्य एकजण दुचाकीवरून फरार झाला. गांजा असल्याचा बहाणा करून दोघा चोरड्यांनी विश्वनाथ श्रीपत शिरोळे यांची जबरी तपासणी सुरू केली. शिरोळे यांनी आरडाओरड केल्याने रस्त्यावरून जाणाºया पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशियतांना ताब्यात घेतले.
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर जबरी लूटमार करणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. अन्य एकजण दुचाकीवरून फरार झाला. गांजा असल्याचा बहाणा करून दोघा चोरड्यांनी विश्वनाथ श्रीपत शिरोळे यांची जबरी तपासणी सुरू केली. शिरोळे यांनी आरडाओरड केल्याने रस्त्यावरून जाणाºया पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशियतांना ताब्यात घेतले. शिरोळे हे नाशिकरोडहून नातलगाचा धार्मिक कार्यक्र म आटोपून बुधवारी दुपारी ४ वाजेला घराकडे जात होते. हॉटेल पंचवटीच्या प्रवेशद्वार क्रमांक दोन समोर येताच एकाने त्यांना थांबण्यास सांगितले. तुम च्याकडे गांजा असून झडती घेऊ द्या, असे म्हणत धक्काबुक्की करत शर्टाच्या खिशातील सात हजार रु पये काढून घेतले, तर बोटातील अंगठी व गळ्यातील सोन्याची चैन ओढू लागले असता शिरोळे यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. याचवेळी महामार्गावर गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, गुन्हेशोध पथकाचे परदेशी, भगवान शिंदे, सचिन गवळी, विनोद टिळे यांनी गोंधळ पाहून धाव घेतली. पोलीस वाहन पाहताच दुचाकीवरील लुटारूने पोबारा केला, तर शिरोळे यांना धकाबुक्की करणारा संशयित पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. अटक केलेल्या संशयिताचे नाव हयातअली बाबुलाल अली (रा. श्रीरामपूर) असे असल्याचे तपासा दरम्यान समजले. फरार दुसºया संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.