सिन्नर तालुक्यात विहिरींनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 05:08 PM2018-11-13T17:08:04+5:302018-11-13T17:08:58+5:30
सिन्नर : उष्णतेची दाहकता दिवसेंदिवस वाढू लागल्याने सिन्नर तालुक्यातील अनेक गावात विहिरी, बोअरवेल, बंधारे आदींनी तळ गाठला आहे. त्यामुळे या भागात टँकर सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सिन्नर : उष्णतेची दाहकता दिवसेंदिवस वाढू लागल्याने सिन्नर तालुक्यातील अनेक गावात विहिरी, बोअरवेल, बंधारे आदींनी तळ गाठला आहे. त्यामुळे या भागात टँकर सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गत वर्षी पाऊस जेमतेम झाल्याने शेतकऱ्यांना पिकांची लागवड करता आली होती. मात्र यावर्षी पावसाने पुर्णपणे पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. तसेच वाडया वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने गत मिहन्यातच विहिरींनी तळ गाठला आहे. बहुतांश शेतकºयांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे शेती आहे. पंरतु यावर्षी पाण्याअभावी शेतात पीके घेता आली नाही.