सिन्नरला पोलिसांप्रति कृतज्ञता सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 09:10 PM2020-05-23T21:10:09+5:302020-05-24T00:28:56+5:30
सिन्नर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, आरोग्य अधिकारी-कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनदेखील दिवसरात्र झटत आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत स्थापित श्री भगवान जिव्हेश्वर महिला स्वयंसहाय्यता बचतगटाच्या वतीने सिन्नर पोलीस स्टेशन येथील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

श्री भगवान जिव्हेश्वर महिला स्वयंसहाय्यता बचतगटाच्या अध्यक्ष व इतर सदस्यांनी सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचे पुष्पवृष्टी करत औक्षण केले. सिन्नर पोलीस प्रशासनाचे प्रमुख पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील व सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिव्हेश्वर महिला स्वयंसहाय्यता बचतगटाच्या सरोजिनी काळमेख यांनी पोलीस स्टेशन येथील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या कार्याला सलाम करत सर्वांचे आभार मानले. यावेळी अनुराधा लोंढे यांचेसह गटातील रोहिणी निचळ, मनीषा ठाणेकर, प्रतिभा ढवण, वत्सलाबाई धारणकर आदींसह महिला सदस्य उपस्थित होत्या.