सिन्नर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, आरोग्य अधिकारी-कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनदेखील दिवसरात्र झटत आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत स्थापित श्री भगवान जिव्हेश्वर महिला स्वयंसहाय्यता बचतगटाच्या वतीने सिन्नर पोलीस स्टेशन येथील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.श्री भगवान जिव्हेश्वर महिला स्वयंसहाय्यता बचतगटाच्या अध्यक्ष व इतर सदस्यांनी सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचे पुष्पवृष्टी करत औक्षण केले. सिन्नर पोलीस प्रशासनाचे प्रमुख पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील व सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिव्हेश्वर महिला स्वयंसहाय्यता बचतगटाच्या सरोजिनी काळमेख यांनी पोलीस स्टेशन येथील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या कार्याला सलाम करत सर्वांचे आभार मानले. यावेळी अनुराधा लोंढे यांचेसह गटातील रोहिणी निचळ, मनीषा ठाणेकर, प्रतिभा ढवण, वत्सलाबाई धारणकर आदींसह महिला सदस्य उपस्थित होत्या.
सिन्नरला पोलिसांप्रति कृतज्ञता सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 9:10 PM