जिल्हा रुग्णालयात सहा कोरोना संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 01:09 AM2020-03-16T01:09:13+5:302020-03-16T01:11:31+5:30
जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात परदेशवारी करून आलेल्या कळवण व पिंपळगाव बसवंतच्या दोघा संशयितांना रविवारी (दि.१५) दाखल करण्यात आले आहे. या दोघांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेला रविवारी पाठविण्यात आले आहेत. शनिवारी चौघांना या कक्षात दाखल केलेले असल्याने येथील रुग्णांची संख्या सहा झाली आहे. दरम्यान, रात्री उशिरा चौघांपैकी तिघांच्या नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आले आहेत. एकाचा नमुना पुरेसा नसल्याने सोमवारी नव्याने नमुना पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात परदेशवारी करून आलेल्या कळवण व पिंपळगाव बसवंतच्या दोघा संशयितांना रविवारी (दि.१५) दाखल करण्यात आले आहे. या दोघांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेला रविवारी पाठविण्यात आले आहेत. शनिवारी चौघांना या कक्षात दाखल केलेले असल्याने येथील रुग्णांची संख्या सहा झाली आहे. दरम्यान, रात्री उशिरा चौघांपैकी तिघांच्या नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आले आहेत. एकाचा नमुना पुरेसा नसल्याने सोमवारी नव्याने नमुना पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.
कोरोना आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी शासनस्तरावरून राज्यभर प्रयत्न केले जात आहे. तसेच शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास, मॉल बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात आहे. गर्दीची ठिकाणे तसेच गर्दीला निमंत्रण देणारे उपक्रम टाळण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. ‘कोरोना’ग्रस्त देशातून परतलेले दाखल
उच्चशिक्षणासाठी पिंपळगावचा एक विद्यार्थी फिलिपिन्समध्ये गेलेला होता. तसेच कळवण तालुक्यातील मानूर येथील एक व्यापारी
दुबईवारी करून आल्यानंतर त्या दोघांनाही सर्दी, खोकला, थकवा यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय निर्देशानुसार त्यांना कोरोना विलगीकरण कक्षात रविवारी दाखल केले. या दोघांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेला रविवारी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.