जिल्ह्यात सहा नवे कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 12:16 AM2020-04-27T00:16:51+5:302020-04-27T00:17:18+5:30
जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. रविवारी सुरगाणा तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या परंतु सध्या नाशकात असलेल्या एकास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. येवला येथे आधीच्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील पाच जणांनाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने चिंतेत भर पडली आहे.
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. रविवारी सुरगाणा तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या परंतु सध्या नाशकात असलेल्या एकास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. येवला येथे आधीच्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील पाच जणांनाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने चिंतेत भर पडली आहे.
रविवारी प्राप्त अहवालानुसार सुरगाणा तालुक्यातील तळपाडा येथील २४ वर्षीय तरुणास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. येवला येथे यापूर्वी आढळून आलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील पाच जणांचे अहवालाही पॉझिटिव्ह आल्याने यंत्रणेने कडक उपाययोजनेचे निर्देश दिले आहेत.
मालेगावी नोकरीस असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शहर सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रांताधिकाºयांनी रविवारी हा आदेश जारी केला. कोरोनाचा संसर्ग अन्य भागात पसरू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक शहरातील २ पॉझिटिव्ह रूग्णांचे अहवाल रविवारी निगेटिव्ह आले असून त्यांच्या ‘डिस्चार्ज’ बाबत सोमवारी (दि.२७) निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याची बाधितांची संख्या १४८ असल्याने चिंता कायम आहे.
च्मालेगावी उपचार घेणाºया तीन रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला. रविवारी सायंकाळी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत तिघांना घरी सोडण्यात आले. कोरोनाबाधित सर्वाधिक झाल्यामुळे मालेगाव ‘हॉटस्पॉट’ बनले आहे. अशा परिस्थितीत तीन जण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेनेही काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडला.