शहरात दिवसभरात सहा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:18 AM2020-06-22T00:18:11+5:302020-06-22T00:19:17+5:30

महानगरात बाधितांच्या संख्येने पुन्हा शतकी आकडा ओलांडत १०८पर्यंत मजल मारली. त्यामुळे नाशिक शहरातील बाधितांचा आकडा थेट १२०९ वर जाऊन पोहोचला आहे. नाशिक महानगरातील बळींमध्ये रविवारी पुन्हा सहा बळींची भर पडली. त्यामुळे शहरातील बळींचा आकडा ६२ वर पोहोचला आहे.

Six people died during the day in the city | शहरात दिवसभरात सहा जणांचा मृत्यू

शहरात दिवसभरात सहा जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देकोरोना : बाधितांच्या संख्येत दिवसभरात १०८ ने वाढ

नाशिक : महानगरात बाधितांच्या संख्येने पुन्हा शतकी आकडा ओलांडत १०८पर्यंत मजल मारली. त्यामुळे नाशिक शहरातील बाधितांचा आकडा थेट १२०९ वर जाऊन पोहोचला आहे. नाशिक महानगरातील बळींमध्ये रविवारी पुन्हा सहा बळींची भर पडली. त्यामुळे शहरातील बळींचा आकडा ६२ वर पोहोचला आहे.
नाशिक महानगरातील घनदाट लोकवस्ती असलेले जुने नाशिक, पंचवटी, पखालरोड, नाशिकरोड आणि वडाळागाव भागात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. जुने नाशिकमधील बुधवारपेठ, जोगवाडा, पिंजारघाट, कथडा, गंजमाळ, खडकाळी, द्वारका या भागात सातत्याने नवनवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्याचप्रमाणे पंचवटीत पेठराड भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळेच नाशिक महानगरात कोरोनाबाधितांची संख्या शंभरहून अधिक आढळण्याची घटना चौथ्यांदा घडली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढू लागल्याचे अधिक प्रकर्षाने जाणवू लागले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाशिक शहराच्या मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी बंद पाळण्यास रविवारपासून प्रारंभ केला असला तरी त्याचा परिणाम जाणवायला अजून कालावधी जावा लागणार आहे. महापालिकेच्या वतीने अधिकाधिक नागरिकांचा स्वॅब घेऊन संशयितांना पहिल्याच फेजमध्ये शोधून काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जितके अधिक संशयित लवकरात लवकर तपासले जातील, तितके पुढील बाधित आढळण्याचे प्रमाण कमी होणार असल्याने महापालिकेच्या वतीने दिवसभरात किमान पाचशे स्वॅब घेण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. या माध्यमातून अधिकाधिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंग काम वेगात सुरू असले तरी कोरोनाबाधितांचा आकडा आणि मृत्यूदराला रोखण्यात यंत्रणा तोकडी पडत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, पंचवटीसह नाशिकरोडमध्येदेखील बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने या भागावरदेखील आरोग्य विभागाला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
जुने नाशिकची वाढ चिंताजनक
महानगरातील सर्वाधिक वेगवान वाढ ही प्रामुख्याने जुने नाशिक आणि पंचवटी परिसरात आहे. मात्र, त्यातही जुने नाशिक आणि वडाळ्यासह पूर्व प्रभागाची वाढ अधिक असल्याने या परिसरावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे धोरण महापालिकेने अवलंबले आहे. या परिसरात जर कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आले तर नाशिक महानगरातही प्रसाराचा वेग कमी होऊ शकणार आहे.

Web Title: Six people died during the day in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.