सिन्नर: तालुक्यातील पास्ते येथे गाळ युक्त शिवार योजनेंतर्गत पाझर तलावातील गाळ उपसा करण्यास सुरूवात करण्यात आली.संस्थेकडून पोकलेन, जेसीबी मशीन दिलेले असून त्यासाठी लागणार इंधन हे शासन देणार आहे. तसेच गाळाची वाहतूक ही लोकसहभागातून केली जाणार आहे. पाझर तलावातील गाळ उपसा केल्यामुळे गावातील जलसाठ्यांमध्ये वाढ होणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांनी सांगितले. यावेळी युवा मित्र संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अजित भोर, जिल्हा समन्वयक मंगेश बोपचे, सोमनाथ वाघ आदींसह सरपंच तसेच गाळ उपसा समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पास्ते येथे गाळयुक्त शिवार योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 5:39 PM