महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा यावर्षीचा आर. आर. आबा पाटील 'सुंदर गाव पुरस्कार' हा सरपंच बाळासाहेब म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली कोटमगाव ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासकामांसाठी मिळाला. यामध्ये सहभागातून ग्राम स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, शुद्ध पिण्याचे पाणी, करवसुली व खर्चाचे नियोजन, पर्यावरणपूरक वृक्षलागवड व संवर्धन, जलसंधारण, गावातील घराघरांत एलईडी लाईट सुविधा, ग्रामपंचायत कामकाज संगणकीकृत अनेक उपक्रम राबविण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार सरोज अहिरे, सीमा हिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, विष्णुपंत म्हैसधुने, गटविकास अधिकारी सारिका बारी, ग्रामसेवक बाळासाहेब कदम, उपसरपंच सोमनाथ कुवर, साहेबराव मस्के, बाळासाहेब घुगे, नाना घुगे, समाधान जाधव, दिलीप राव घुगे, चंद्रकांत म्हस्के, गणेश गोसावी, राजू शिंदे आदी उपस्थित होते.
(फोटो १६ कोटमगाव)