वेळुंजे : महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाणारा सन २०२०-२१ चा आर. आर.आबा पाटील स्मार्टग्राम पुरस्कार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली गावाला दिल्याने त्र्यंबकेश्वर व अंबोली च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.यासाठी गावाला २० लाखाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. ग्रामविकासात मानाचा समजला जाणारा या पुरस्काराकरिता त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एकूण १७ गावांचा समावेश होता, त्यापैकी ४ गावांत चुरशीची लढत होती. त्यापैकी अंबोली गावाची प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली. या करिता ग्रामपंचायतीच्या सरपंच चंद्रभागा लचके, उपसरपंच लंकाताई मेढे, ग्रामसेवक जितेंद्र नांद्रे, सदस्य गोकुळ मेढे, अनिल भोई, तानाजी कड, काळूबाबा लचके, काळूबाई ताठे, राधाताई गुंबाडे, ज्योतीताई लचके, ग्रामपालिका कर्मचारी त्र्यंबक मेंगाळ, सूर्यकांत मेढे यांच्या कामामुळे सदर पुरस्कार मिळण्यास सहमार्य मिळाले.तसेच अरुण मेढे ( राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष), ॲड भास्कर मेढे, संजय मेढे, ॲड. शरद मेढे यांचे सहकार्य लाभले,सदर पुरस्काराकरिता सर्वांनी मेहनत घेतली. ग्रामपंचायतीकडून गावाकरिता पायाभूत सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून दिल्यात. व्यवस्थित केलेले नियोजन मेहनत याकामी कामास आली. गावात रस्ते, भूमिगत गटारी, दिवाबत्ती, वॉटर फिल्टरेशन प्लांट, ग्रंथालय, स्मशानभूमी, दशक्रियाविधी शेड, वृक्ष लागवड, शोचालय, पाण्याची सुविधा, पेव्हर ब्लॉक, गोबरगॅस इत्यादी कामे करण्यात आली आहेत.